संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि . ११ जून २०२६
अहिल्यानगर, प्रतिनिधी
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पुन्हा एकदा धडक कारवाई करत कर्जत व मिरजगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण ५५ हजार ५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती संकलित करून कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना दिले होते.
त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक कबाडी यांनी पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार शामसुंदर सागर ससाणे, आकाश काळे, भाऊसाहेब काळे तसेच चालक चंद्रकांत कुसळकर यांचे विशेष पथक तयार करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
दिनांक १० जून २०२६ रोजी पथकाने कर्जत व मिरजगाव परिसरात गुप्त माहितीच्या आधारे अवैध दारू विक्री सुरू असलेल्या ठिकाणांवर छापे टाकले. या मोहिमेदरम्यान एकूण ७ ठिकाणी छापे टाकण्यात आले. कारवाईत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५५,००५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस ठाणेनिहाय कारवाई
पोलीस ठाणे
गुन्हे दाखल जप्त मुद्देमाल कर्जत ०५ ₹४७,२४५
मिरजगाव ०२ ₹७,७६०
एकूण ०७₹५५,००५
जिल्ह्यात अवैध दारू विक्री, जुगार व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधातील अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.