तलवारीने जिवे मारण्याचा प्रयत्न,श्रीगोंद्यात गुन्हा दाखल,मोका लावण्याचे आदेश

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . ७ जून २०२६

प्रतिनिधी,

प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, दिनांक 27/02/2026 रोजी 16-30 वा.चे.सुमा. फिर्यादी यांचे चौधरी मळा, काष्टी,ता.श्रीगोंदा,जि.अहिल्यानगर येथे टोळी प्रमुख सुभाष कोंडीबा चौधरी, टोळी सदस्य वैभव सुभाष चौधरी,साई संजय मदने,सर्व रा. काष्टी,ता.श्रीगोंदा,जि.अहिल्यानगर व त्याचे साथीदार यांनी चारचाकी व दुचाकी गाड्यांवरुन येवुन फिर्यादीचे घरावर दगडे मारुन आरोपी नामे सुभाष कोंडीबा चौधरी याने फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशाने तलवारीने मारहान करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्यादीने तलवारीचे वार हुकविल्याने त्याचा जिव वाचला. तसेच आरोपी नामे वैभव सुभाष चौधरी व त्याचे सोबतचे साथीदारांनी फिर्यादीचे घरात अनाधिकाराने प्रवेश करुन फिर्यादीचे आईला लाथाबुक्याने मारहान करुन फिर्यादीस म्हणाले की, तुम्हाला जर या ठिकाणी जिवंत राहावयाचे असेल तर यापुढे महिन्याला आंम्हाला 15,000/- दयावे लागतील असे म्हणुन खंडणी मागितली बाबत दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता. 

 सदर गुन्हयाचे तपासात आरोपीनामे (1) सुभाष कोंडीबा चौधरी, (टोळी प्रमुख), (2) वैभव सुभाष चौधरी (टोळी सदस्य) व (3) साई संजय मदने (टोळी सदस्य) यांना अटक करण्यात आलेली आहे. नमुद आरोपींविरुध्द श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन मालमत्ता हिसकावुन घेणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन घातक हत्यारासह जिवे ठार मारण्याची धमकी देणे, जबरी चोरी करणे,रस्त्यात अडवुन शिवीगाळ दमदाटी करणे,शासकीय नोकरास त्याचे शासकीय कर्तव्यापासुन परावृत्त होण्यासाठी शिवीगाळ दमदाटी करणे, अग्नीशस्त्रासह शिवीगाळ दमदाटी करुन खंडणी मागणे, शिवीगाळ दमदाटी करुन नुकसान करणे, शासकीय नोकरास त्याचे कर्तव्यापासुन परावृत्त करण्यासाठी दुखापत करुन शासकीय कामापासुन परावृत्त करणेतसेच हद्दपार आदेशाचे उल्लंघण करणे असे गंभीर स्वरुपाचे 18 गुन्हे दाखल आहेत. 

 पोलीस निरीक्षक, किरण शिंदे, श्रीगोंदा पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांनी नमुद आरोपींविरुध्द मोका कायदयाअंतर्गत वाढीव कलम लावणे बाबतचा प्रस्ताव आमचे मा.विशेष पोलीस महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांना मोका कायदयातील वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळणेकामी अहवाल सादर केला होता. 

 त्यावर मा.विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी आरोपीनामे (1) सुभाष कोंडीबा चौधरी, (टोळी प्रमुख), (2) वैभव सुभाष चौधरी (टोळी सदस्य) व (3) साई संजय मदने (टोळी सदस्य) (4) सुजित इथापे, (5)मयुर गव्हाणे,(6)नितीन गव्हाणे,(7)नितीन पवार,(8) चिंगा भागवत यांच्या विरुध्द मोका कायदयान्वये वाढीव कलम लावण्याची मंजुरी दिलेली आहे. 

 भविष्यात अहिल्यानगर जिल्हयात कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या व सराईत गुन्हेगारांवर मोका कायदया अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असुन नागरीकांनी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींची मनात भिती बाळगु नये.असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे

Related Post