श्रीगोंदा शहरात रात्रीच्या वेळी नागरिकांना अडवून लूटमार करणारा पाहिजे असलेला आरोपी श्रीगोंदा पोलिसांकडून अटक.

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . २१ जून २०२६

प्रतीनिधी,

श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 611/2026 BNS-309(6) वैगेरे मधील पाहिजे आरोपी अभिषेक संजय तळेकर, वय- 24 वर्षे रा- झेंडा चौक श्रीगोंदा ता- श्रीगोंदा हा त्याचे नातेवाईकांची घरी आल्याची गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळताच सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन , अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे , उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात पो ना.जी.बी. यादव पो.कॉ राऊत, पो कॉ दळवी व पो.कॉ कोहक यांनी केलेली आहे.

सदर गुन्हयातील आरोपींनी पुर्व इतिहास पाहिला असता सदर आरोपी चे विरोधात बऱ्याच तक्रारी आहेत तसेच महिलांनाही त्रास दिल्याच्या माहिती मिळालेल्या आहेत तरी कोणाची काही तक्रार असल्यास पोस्टला येऊन तक्रार देण्याचे आव्हान पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

Related Post