संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि . १६ जून २०२६
प्रतिनिधी,
श्रीगोंदा पोस्ट गुरन 595/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 103 वगैरे गुन्ह्यातील अटक आरोपी नामे विलास दादा गावडे रा. पिसोरेखंड तालुका श्रीगोंदा यास मा.न्यायालयासमोर हजर केले असता,मा. न्यायालयाने आरोपितास पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे. पोलीस कोठडी दरम्यान नमूद आरोपी याने खुनाच्या गुन्ह्यात वापरलेले हत्यार हे मेमोरंडम पंचनामा अन्वये जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर , पोलीस कॉन्स्टेबल संदीप शिरसाठ,राहुल मोढळे, शरद चौभे यांनी केलेली आहे.