संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि . ६ मे २०२६
लिंपणगाव ( प्रतिनिधी-)-कर्जत तालुका भैरोबा वाडी रस्त्यावर कुटुंबासह बाबुळगावला निघालेलो असताना अचानक रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेतील मोर दिसला. मोराच्या डोळ्यावरती कोणत्यातरी पक्षाने हल्ला केल्यामुळे मोराचे डोळे पूर्णपणे जखमी झाल्यामुळे त्याला काही दिसत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये कला शिक्षक अभिषेक उदमले व सामाजिक कार्यकर्ते सुनील यादव यांनी मोराला अलगद पकडून ताबडतोब वनाधिकारी चित्रा शीद यांना स्वतः कलाशिक्षक अभिषेक उदमले यांनी या घटनेचा तपशील फोनवर कळवण्यात आले. थोड्याच वेळात वन अधिकारी चित्रा शीद यांची गाडी घटनास्थळी आली नंतर या मोराला पाणी पाजून सुखरूप त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. या त्यांच्या धाडसी स्वभावामुळे निश्चितच प्राणी मित्रावर जीवापाड प्रेम दिसून आले.