संघर्षनामा । वृत्ततेवा
दि .२ एप्रिल २०२६
अहिल्यानगर (प्रतिनिधी)
वाळुंज गावचे सुपुत्र तथा Central Reserve Police Force (सीआरपीएफ) मध्ये असिस्टंट कमांडंट पदावर कार्यरत राहिलेले माधव विठोबा दरेकर सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या सेवापूर्ती निमित्त भव्य स्वागत व शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
सीआरपीएफमध्ये कार्यरत असताना माधव दरेकर यांनी देशाच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट सेवेमुळे त्यांना दलामध्ये विशेष सन्मानाने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कार्यामुळे वाळुंज गावासह संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
हा समारंभ रविवार दिनांक १० मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता ज्ञानदिप विद्यालय वाळुंज येथे संपन्न होणार आहे.
देशसेवेत उल्लेखनीय योगदान दिलेल्या माधव दरेकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सैनिक ग्रुप, मित्रमंडळ तसेच समस्त ग्रामस्थ वाळुंज यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या प्रसंगी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून दरेकर यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.