संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे नव्याने हजर झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन दिनकर मोहिते यांचा कोळगाव चे युवा कार्यकर्ते सचिन साहेबराव लगड यांनी श्री मोहिते यांचे स्वागत करून सन्मान करण्यात आला. निरीक्षक श्री मोहिते यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे मूळ गाव जामखेड तालुका पाटेवाडी हे असून त्यांची नुकतीच बदली श्रीगोंदा पोलीस स्टेशनला झाल्याने त्यांचे स्नेही मित्र सचिन लगड यांनी स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आहेर साहेब, जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर, प्रा निसार शेख, अभिषेक उदमले, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.