रेहेकुरी रस्ताचे काम चालू करण्याचें सभापती प्रा. राम शिंदे यांचे आदेश ,

संघर्षनामा वृतसेवा । कर्जत

दि . २५ऑक्टोबर २०२५

प्रतिनिधी ,

जे झालं त्याचा पच्छाताप आम्हाला होत असून आमचा रस्ता मात्र करून द्या अशी एकसूत्री मागणी रेहेकुरी येथील ग्रामस्थांनी सभापती राम शिंदे यांच्या कडे केली. 

   याबाबत माहिती घेतली असता असे समजले की, सभापती राम शिंदे हे रेहेकुरी येथे भेटीसाठी गेले असता अचानक ग्रामस्थांनी सभापती राम शिंदे यांना वेढा टाकला असता राम शिंदे यांनी सर्व गावकऱ्यां बरोबर चर्चा झाली असता गावातील नागरिकांनी रस्ताचा विषय काढला त्यावेळी राम शिंदे यांनी मी पडलेला आमदार असुन मी कामे केली तरी लोक मत देत नाहीत यावर गावकऱ्यांनी म्हणाले सर आमच्या गावाने ज्यांना भरभरून मते दिली ते आता आम्हाला विसरले आमच्या रस्ताचे काम तुम्हीच करू शकता . झालेल्या गोष्टीचा आम्हाला पस्तावा आहे पण आमचा रेहेकुरी ते रेहेकुरी फाटा रस्ता तेवढा करून द्याच अशी मागणी केली. मग सभापती राम शिंदे यांनी तातडीने अधिका-यांना लाईनवर घेत लगेच रस्ता काम चालू करण्याचा आदेश दिला. 

रेहेकुरी फाटा ते रेहेकुरी गावा पर्यंत चा रस्ता प्रा. राम शिंदे यांनी १३/३/२३ला हा रस्ता मंजूर केला होता. एवढेच नव्हे तर ६/१२/२३ ला रस्ता काम सुरू करण्याची वर्क ऑर्डर ही देण्यात आली होती. या वर्क ऑर्डर मध्ये नमूद केले आहे की, रेहेकुरी प्रजिमा ११५ ते . ० ते २.० कि. मी रस्ता करणे व या कामाची मुदत १८ महिने होती ही मुदत दिली ५/६/२०२५ लाच संपली तरीही हा रस्ता काम झाले नाही. ही वस्तुस्थिती सभापती राम शिंदे यांच्या लक्षात आल्यावर मग काय सभापती राम शिंदे प्रचंड चिडले अधिका-यांना जाब विचारला व लगेच रस्ता काम सुरू करण्याचे आदेश दिले. 

    रेहेकुरी फाटा ते रेहेकुरी गावा पर्यंत चा रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर असूनही तो रस्ता करून दिला नाही कारण विधानसभेच्या निवडणुकीत आ.रोहित पवार यांना मतदान कमी होईल व कामाचे श्रेय प्रा . राम शिंदे यांना जाईल ह्या भितीमुळे आ . रोहित पवार यांनी ठेकेदारावर दबाव टाकून या रस्त्याचे काम करू दिले नाही असा आरोप भाजपाचे तालुका अध्यक्ष अनिल गदादे यांनी केला आहे.

Related Post