संघर्षनामा वृत्तसेवा l कर्जत
दि.१४जाने.२०२५
प्रतिनिधी , उज्वला उल्हारे
मिरजगाव :- कोकणगाव येथील रहिवासी असणारे आकाश सूर्यवंशी,सध्या पुणे येथे इंजिनीरिंग बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून,बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या व पत्रकार क्षेत्रात कार्य करत असणाऱ्या सौ. प्रतिक्षा आकाश सूर्यवंशी यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जय युवा अकॅडमी व नेहरू युवा कार्यक्रम एवंम खेल मंत्रालय भारत सरकार केंद्र यांच्या वतीने राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचे वितरण १२ जानेवारी २०२५ रोजी अहिल्यानगर येथे खासदार मा. श्री. निलेश लंके यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक व पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.
विविध क्षेत्रातील सन्माननीय मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातून शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कृषी, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. माजी मुख्याध्यापक भाऊसाहेब सुद्रिक, पद्मिनीताई सुद्रिक , प्रविण सुद्रिक, माधुरीताई सुद्रिक, मंदाताई सुद्रिक, नानासाहेब सूर्यवंशी, साधना सूर्यवंशी,कु.अक्षरा, विराज सूर्यवंशी, इलाही बकस शेख मामा, अहिल्यानगर कृषी विभागाचे उपाध्यक्ष पप्पूशेठ सुद्रिक, नामदेव कानगुडे, महाराष्ट्र राज्य फ्रीडम पावर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक मेढे साहेब ,राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाजीराव खांदवे साहेब , राज्य प्रवक्ते अशोकराव सूर्यवंशी, संघर्षनामा मल्टीमीडिया चे संपादक भीमराव उल्हारे, पत्रकार उज्वला उल्हारे , इंजिनीयर महेश निंबाळकर, व सर्व निंबाळकर परिवार या राज्यस्तरीय सावित्री ज्योती या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.
इंजिनीयर आकाश सूर्यवंशी व पत्रकार प्रतिक्षा सूर्यवंशी यांचे उपस्थिताकडून अभिनंदन करण्यात आले. पोलीस अधिकारी वैभवजी महांगरे, मिरजगाव पोलीस स्टेशनचे ए.पी.आय अधिकारी प्रकाश पाटील, ए.पी.आय सोमनाथ दिवटे साहेब प्रियंका महांगरे, पी.एस.आय ढगे साहेब, दैनिक लोक परिवर्तन चे संपादक आबासाहेब शिरसाट, संपादक सुनील खामगळ, उपसंपादक भारत भालेराव सर, अशोक मामा निमसे यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या .