सतीश ओहोळ वादळी सन्मान पुरस्काराने सन्मानित .

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.११सप्टेंबर २०२४

प्रतिनिधी,

साप्ताहिक वादळी स्वातंत्र्य च्या तप पूर्ती सोहळ्यानिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सतिष ओहोळ सर यांना लोणी व्यंकनाथ येथे समारंभ पूर्वक सुवर्णाताई पाचपुते दिग्विजय नागवडे  संपादक जितेंद्र पितळे उपसंपादक बालासाहेब मंत्री आदर्श शिक्षक रामदास ठाकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला .सतीश ओहोळ  हे विद्यार्थीदसे पासून सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय काम करत आहेत . सामाजिक बांधिलकी स्वीकारून सर्व महापुरुषांचे विचार बहुजन चळवळीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत कार्यरत असतात.ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्रीगोंदा तालुका संयोजक भारतीय बौद्ध महासभेची अहमदनगर जिल्हा सचिव, राहुल वसतिगृह श्रीगोंदा समन्वयक इत्यादी ठिकाणी काम पहात आहेत. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले .

Related Post