एकविरा मित्र मंडळाच्या वतीने मर्दानी खेळ प्रात्यक्षिक संपन्न !

संघर्षनामा वृत्तसेवा - पुणे

दि. 18 सप्टेंबर 2024

प्रतिनिधी - उज्वला उल्हारे

वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील एकविरा मित्र मंडळाने महाराष्ट्राची ऐतिहासिक वारसा असलेले मर्दानी खेळ नव्या पिढीला कळावेत व स्व: संरक्षणाच्या दृष्टीने मुलांनी ते शिकावे या उद्देशाने मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक आयोजित केले होते.

 यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुधीर आबासाहेब वाल्हेकर, उपाध्यक्ष भाजप पि चिं शहर पल्लवी सुधीर वाल्हेकर, यश वाल्हेकर यांनी मर्दानी खेळ सादर करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले, सदर मर्दानी खेळ प्रात्यक्षिक मर्दानी खेळ असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले .

यावेळी सामील खेळाडूंनी मर्दानी खेळ, लाठी काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, असे साहसी खेळ सादर केले .

प्रात्यक्षिक करणाऱ्या मुलांची नावे पुढीलप्रमाणे -

शिवदत्त सिंग,यश बालगुडे,ओम परदेसी,कृष्णा परदेशी,नैतिक उनेचा,काशिनाथ हेळवे,राजवायकुळे निखिल विश्वकर्मा, स्वराज अडागळे सर्व खेळाडूंना संजय बनसोडे,किरण अडागळे ,

स्मिता धिवार, रविराज चखाले, रूपा चखाले,गणेश चखाले,यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Post