संघर्षनामा वृत्तसेवा I श्रीगोंदा
दि.13 सप्टेंबर २०२४
प्रतिनिधी,
साप्ताहिक वादळी स्वातंत्र्य च्या तप पूर्ती सोहळ्यानिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रमोद जालिंदर उजगरे यांना लोणी व्यंकनाथ येथे समारंभ पूर्वक सुवर्णाताई पाचपुते दिग्विजय नागवडे संपादक जितेंद्र पितळे उपसंपादक बालासाहेब मंत्री आदर्श शिक्षक रामदास ठाकर संतोषजी जठार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला .प्रमोद उजगरे हे विद्यार्थीदसे पासून सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय काम करत आहेत . सामाजिक बांधिलकी स्वीकारून सर्व महापुरुषांचे विचार बहुजन चळवळीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत कार्यरत असतात.त्यांनी अनेक आंदोलन तसेंच सामाजिक तसेंच अनेक व्यक्तींना रेशनकार्ड, आधारकार्डचे कॅम्प लावून मदत केलेली आहेत. सध्या ते अडव्होकेट रमेशजी जठार यांचेकडे जुनिअरशिप करून सामाजिक काम पहात आहेत. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले .