संघर्षनामा वृत्तसेवा l जामखेड
दि.१५सप्टेंबर २०२४
प्रतिनिधी ,उज्वला उल्हारे
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत मुलांच्या गटात कोरडे वैष्णव, बेनकर दीपक, पठारे रोहन, सहाणे जनक, होडशील दीपक, जावळे धीरज यांची तर मुलींच्या गटात ढाकणे वैष्णवी, सोनवणे सम्रता, कुऱ्हे ऋतुजा, भांडकोळी वैष्णवी, निमसे नम्रता, डोंगरे समीक्षा यांची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली
श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाच्या श्री संत गजानन महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व नगर जिल्हा क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने अंतर महाविद्यालयीन जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा दिनांक 14 रोजी पार पडली या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.विजयसिंह गोलेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील नऊ महाविद्यालयाने सहभाग नोंदवला. स्पर्धेचे सचिव म्हणून जिल्हा क्रीडा विभागाचे सचिव प्रा. डॉ. राजेंद्रकुमार देवकाते उपस्थित होते तर पंच म्हणून संगमनेर येथील निसर्गोपचार तज्ञ व राष्ट्रीय पंच प्रा. सुनील पथवे, प्रा. काजल ताजने, प्रा. सुरज फोपाळे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. चंद्रसेन आवारे, सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिवानंद जाधव, प्रस्ताविक प्रा. डॉ.राजू म्हेत्रे , प्रमुख उपस्थिती म्हणून मा. विजयसिंह गोलेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिविंग चे पत्रकार संतोष थोरात लाभले.
प्रतिक्रिया 1
यावर्षी महाविद्यालयाला तिसऱ्यांदा योग स्पर्धा आयोजन करण्याचा मान मिळाला. सर्व स्पर्धकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, उत्तम नियोजनासाठी सेवकांचे कौतुक आणि अभिनंदन. अशी प्रतिक्रिया श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ, खर्डा सचिव. डॉ. महेश गोलेकर यांनी व्यक्त केले.