शिक्षक व सैनिकाचा सन्मान महत्वाचा- मा.सुभेदार जगन्नाथ खामकर

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.१२ सप्टेंबर २०२४

प्रतिनिधी,

सैनिक हा देशाचा आत्मा आहे. रात्रं दिवस सैनिक पहारा देत असतात .ऑक्सिजन पातळी कमी असलेल्या ठिकाणी, बर्फाच्या प्रदेशात, थंडीत,  वादळात ते स्वयं शिस्तीने काम करतात याचाच आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. देशातील सैनिक व शिक्षक यांचा सन्मान करण्यात यावा असे प्रतिपादन कोर कमेटी अध्यक्ष भारतीय जवान किसान पार्टी महाराष्ट्र राज्य मा.सुभेदार मेजर जगन्नाथ खामकर यांनी केले. 

संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील श्री. मनोहर बाबा विद्यालयात गणेश उत्सवानिमित्त व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. 

उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक श्री एस.बी. सातपुते यांनी केले. 

सदर कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर श्री. मनोहरदास बाबा शिक्षण प्रसारक मंडळ सायखिंडी संस्थेचे सेक्रेटरी अँड. गणपतराव गांडोळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास जेडगुले, सामाजिक कार्यकर्ते सुनिलभाऊ पारधी, मेजर विजयकुमार शिंदे, मेजर अजय शिंदे, श्री मनोहर बाबा विद्यालय शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अँड. शिवाजीराव ताजणपूरे , सदस्य अरुणराव नन्नवरे, आदी उपस्थित होते. 

     सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे सेवक श्री राजेश गायकवाड यांना मेजर खामकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर देशात प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल कुमारी स्नेहा गोरे हिला भेटवस्तू देऊन सन्मानित केले.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गजानन गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन श्री. जयराम खर्डे यांनी मानले.‌

 सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीसमर्थ वर्पे, श्री रविंद्र वर्पे, श्री अशोक बांबळे, श्रीमती अनिता डांगे, श्रीमती सुषमा काळे, श्रीमती सविता खर्डे, श्री रोहीदास गांडोळे, श्री रामेश्वर शिंदे, श्री स्वप्निल बो-हाडे, श्री राजेश गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले. 

सदर कार्यक्रमास पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Post