संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.१५सप्टेंबर २०२४
प्रतीनीधी,
गणेशोत्सव व ईद - ए - मिलाद सण शांततेमध्ये पार पडावे याकरीता कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निर्णय आणि नियमावली जाहिर कऱण्यात आली आहे.
1. गुन्हे दाखल असलेल्या इसमावर पुन्हा गुन्हा करू नये या करीता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 126 नुसार 60 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाया
2. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इसमावर पुन्हा गुन्हा करू नये या करीता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 129 अन्वये 05 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई
3. मोठ्या प्रमाणावर गंभीर गुन्हे असलेल्या इसमावर त्यांनी पुन्हा गुन्हे करू नये याकरीता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये 56 इसमांना श्रीगोंदा तालुक्यातुन हद्दपार केले आहे.
4. गणेश उत्सव व ईद - ए - मिलाद सण शांततेमध्ये पार पडावे याकरीता मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 168 प्रमाणे 129 नोटिसची बजावणी करण्यात आली आहे.
5. ०२ पैक्षा जास्त केसेस दाखल असलेल्या अवैध दारु विक्रेते यांचेवर महा.दारु बंदी अधिनियम कलम 93 अन्वये 26 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई
6. गणेश उत्सव व ईद - ए - मिलाद सणामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवणारे समाजकंटक यांचेवर मुंबई पोलीस कायदा कलम 56 अन्वये ०७ ईसामांवर हद्दपार कारवाई करण्यात आली आहे..
सर्व नागरिकांना श्री-गणेश स्थापना ते विसर्जन मिरवणुक तसेच ईद-ए - मिलाद कालावधी आणि मिरवणूका शांततेमध्ये पार पाडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक श्री किरण शिंदे यांनी केले आहे.