संघर्षनामा वृत्तसेवा l सिध्दटेक
दि.१२सप्टेंबर २०२४
प्रतिनिधी, सुनिल मोरे
गौरी गणपती सणानिमित्त सगळीकडेच उस्ताह बघायला मिळत आहे घरोघरी आकर्षक सजावट आणि देखावे सादर करीत असतात. अशाच प्रकारे अष्टिनायकांपैकी एक गणपती श्री क्षेत्र सिद्धटेक येथील मोरे कुटुंबीयांनी टाकावू वस्तूंपासून पर्यावरण पूरक असा वटसावित्रीचा देखावा तयार केला आहे.
सुनील मोरे व त्यांची पत्नी सोनाली मोरे हे दरवर्षी अश्या प्रकारचे देखावे आणि सजावट करीत असतात. हा देखावा सादर करण्याकरिता दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागला. या देखाव्यातून पारंपरिक सण तसेच स्री सक्षमीकरणाच्या संदेश देण्यात आला आहे.