रूद्रवेदचा ६वा वाढदिवस शरणपूर वृद्धाश्रमात साजरा.

संघर्षनामा वृत्तसेवा lनेवासा 

दि.७सप्टेंबर २०२४

प्रतिनिधी,

नेवासा खडकारोड मुकींदपूर येथील देवखिळे मळा येथे असलेल्या वृद्धाश्रमात आजी आजोबां समवेत मा.प्रा. श्री.संतोष निंबाळकर सर यांच्या मुलाचा ६वा वाढदिवस आज करण्यात आला. 

प्रा.संतोष निंबाळकर सर प्रेत्यक वर्षी रूद्रवेद यांचा वाढदिवस न चुकता गेल्या ५ वर्षांपासून करत आले असून आज ६व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरणपूर वृध्दाश्रमातील आजी आजोबांना मिष्टान्न भोजन तसेच जीवनाआवश्यक वस्तु स्वरूपात  सर्व आजी आजोबांना खोबरेल तेलाची, बाटली,कपडयाची साबण,अंघोळीचा साबण,कोलगेट,मंजन ईत्यादी प्रत्येकी किट देण्यात आले. यावेळी शरणपूर वृध्दाश्रमाचे अध्यक्ष मा.बाळासाहेब देवखिळे सर यानी त्यांचे शाल श्रीफल देवून सत्कार केला तर त्यांच्या सौभाग्यवती प्रतिक्षाताई  निंबाळकर यांचा सत्कार संस्थेच्या सचिव सुरेखाताई मगर यांनी केला. यावेळी बोलताना निंबाळकर सर म्हणाले की ,याआश्रमामध्ये दुर्लक्षित निराधारांना मायेत्वाचाआधार दिला जात असुन या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

 प्रसंगी संस्थांपक अध्यक्ष रावसाहेब मगर यांनी शरणपूर वृद्धाश्रमाची माहिती सांगितली व सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

Related Post