संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.७सप्टेंबर २०२४
लिंपणगाव ( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांचा दि. ९ सप्टेंबर रोजी होणारा वाढदिवस हा साधेपणाने साजरा होणार असून वाढदिवसाच्या दिवशी आमदार पाचपुते हे श्रीगोंदा नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी हितगुज साधणार असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी आज श्रीगोंद्यात माऊली निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांच्यासमवेत भाजप तालुकाध्यक्ष संदीप नागवडे सर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र उकांडे हे उपस्थित होते.
यावेळी विक्रमसिंह पाचपुते यांनी विधानसभा उमेदवारीबाबत थेट बोलणे टाळत पाचपुते कुटुंबातील उमेदवार कार्यकर्ते ठरवतील असे त्यांनी सांगितले.
सविस्तर माहिती देताना विक्रम पाचपुते म्हणाले की,वाढदिवसाच्या दिवशी काष्टी येथे भाजप डॉक्टर असोशीएशन च्या वतीने गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि मोफत औषधे वाटप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांशी हितगुज साधता यावे त्यांच्याशी चर्चा व्हावी या उद्देशाने त्या दिवशी दिवसभर काष्टी निवासस्थानी आ. पाचपुते हे कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहेत
यावेळी श्रीगोंदा तालुक्यात केलेल्या विकासकामां बाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विक्रमसिंह यांनी सांगितले की श्रीगोंदा शहरातील मुस्लिम बांधवांच्या इदगाह मैदान,डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक थीम पार्क,ओपन जिम अश्या विविध योजनांसाठी नुकताच दहा कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे श्रीगोंदा नगर तालुक्यातील जवळपास ६५०किमी जिल्हामार्गांचे राज्य मार्गत रूपांतर केले आहे ग्रामीण मार्गांचे प्रमुख जिल्हामार्गात रूपांतर केले आहे तालुक्यात पूर्व पश्चिम रस्ते जोडले असून बेलवंडी फाटा(नगर-पुणे रोड)ते श्रीगोंदा, श्रीगोंदा ते कोळगाव(वडाळी,सुरोडी मार्गे), श्रीगोंदा मांडवगण या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार असून आठ ते दहा दिवसात त्याची वर्क ऑर्डर होणार असल्याची माहिती पाचपुते यांनी यावेळी दिली
रस्त्यांसह देवस्थानांना सुद्धा निधी..
श्रीगोंदा नगर तालुक्यातील रस्त्यासह आगडगाव देवस्थान,कौठा येथील काळाराम राम मंदिर, शहरातील शनी मारुती मंदिर या देवस्थानाचा क वर्गात समावेश करण्यासह विशेष निधी मंजूर केल्याचे पाचपुते यांनी सांगितले
कुकडी,घोड अस्तरीकरणासाठी निधी मंजूर..
कुकडीचे पाणी सर्वांना मिळत नाही याचे कारण तालुक्यातील कालव्यांची असलेली नादुरुस्ती हे असून कुकडी कालव्याच्या अस्तरीकरणासाठी ८६कोटी रुपये तर घोड च्या अस्तरीकरणासाठी ६३कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
श्रीगोंदा शहरासह तालुक्याचा वीज प्रश्न सुटणार..
श्रीगोंदा शहरात १०कोटी रुपयांचे १०००सौरदिवे आणले असून त्यातील ४००दिवे बसवण्यात आले आहेत तसेच विजेची ३३केव्हीची मेन लाईन दुरुस्तीचे काम लवकरच होणार असून त्यानंतर श्रीगोंदा तालुक्यासह शहरातील विजप्रश्न मार्गी लागणार आहे
त्या जागेवर पुढील दीड वर्ष्यात एमआयडीसी उभी राहील..
पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार डॉ सुजय विखे यांच्या विशेष प्रयत्नातून बेलवंडी येथील कृषी महामंडळाची जागा एमआयडीसीच्या पहिल्या टप्प्यासाठी मंजूर झाली असून पहिल्या फेजसाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे येत्या दीड वर्ष्यात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन त्या ठिकाणी एमआयडीसी उभी राहील असे पाचपुते यांनी सांगितले
पोलीस आणि महसूल च्या अधिकाऱ्यांची आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊ...
श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे नव्याने रुजु झालेले पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांच्या कामकाजाबाबत लोकांमध्ये नाराजगी असल्याचे सांगितल्यावर लवकरच आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत या अधिकाऱ्यांसह लोकांची बैठक आयोजित करू असे विक्रम पाचपुते यांनी सांगितले तसेच जनतेच्या नगरपरिषदेच्या तक्रारीबाबत मुख्याधिकाऱ्यांच्या उलस्थितीत घेतलेल्या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळून लोकांचे प्रश्न मार्गी लागल्याचे पाचपुते यांनी सांगितले.