वैचारिक प्रहार, अनमोल विचार

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.१७सप्टेंबर २०२४

प्रतिनिधी,

जीवनात तुम्ही निष्ठेने आणि तत्वाने जे मिळवाल तेच तुमच्याजवळ राहते.

व्याभिचाराने मिळविलेले नियतीच्या वजाबाकी मध्ये जमा होते.

तुम्ही कुणाचेही वाईट कराल!

तर तुमच्यावर येणाऱ्या तशा वेळेची वाट पहा...!!

तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब वेळेकडे असतो.

आपण आपल्या मुलांना नेहमी म्हणत असतो. 

असे करा! असे करू नका...!!

त्यांच्याबरोबर असे वागणे एक प्रकारची त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आहे. 

ते फक्त तुमच्या भीतीपोटी तसे वागत असतात. 

फक्त आदेश व उपदेश देणे पर्याप्त नसते. 

आपण त्यांना सांगतो की, तुम्ही खोटे बोलू नका! चोरी करू नका! परंतु प्रत्येक जण छोटी किंवा मोठी चोरी करितो. 

आणि खोटे देखील रेटून बोलतो. 

परंतु जर तुम्ही तुमच्या वागणुकीतून मुलांना शिकविले तर, मुलावर त्याचा चांगला प्रभाव पडतो. 

मुले तुम्हाला बघून शिकतात. 

 स्वतः मात्र चुकीचे वागायचे आणि दुसऱ्यांना चांगले वागायचे उपदेश व ज्ञान द्यायचे कितपत योग्य आहे? 

हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा? 

मुले फक्त सूचना दिल्याने शिकत नाही. 

तर ते निरीक्षण करून शिकतात. 

जीवनात तुम्ही एकदा निर्णय घेतला तर, पुन्हा पाठीमागे बिलकुल बघायचे नाही. 

कारण पलटून - पलटून मागे बघणारे कधीही इतिहास घडवू शकत नाही. 

हाती घेतलेले कार्य एकाग्र होऊन करीत रहा. स्वतःवर एवढा भरोसा ठेवा की जिकडे पण जाऊ तिकडे आपला नवीन रस्ता बनवू. 

जगाची रीत आहे की, जर साप आपल्या घरात निघाला तर, आपण त्याला काठीने मारतो.  तोच साप जर मंदिरात निघला तर, त्याची पूजा करतो, त्याला हात जोडतो, त्याला दूध पाजतो. 

म्हणून ध्यानात ठेवा! माणसं सन्मान तुमचा नाही तर, तुमच्या वेळेचा आणि तुमच्या परिस्थितीचा करतात.

कोणत्याही क्षेत्रात कार्य करीत असताना, यशस्वी झाला नाही तरी, तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्यांनी तुमचे कौतुक केले पाहिजे. 

 तुम्ही खूप मेहनत केली होती तरी, तुम्हाला  यश मिळाले नाही. 

म्हणून उदास होऊ नका...!! 

आपण पुन्हा जोरात प्रयत्न करू. 

आपल्याला या वेळेस जरूर यश मिळेल. 

असे त्यांना प्रेरित करा!

त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जाचा संचार होईल. 

आणि ते जोमाने कार्याला पुन्हा सुरुवात करतील.

जीवनामध्ये जेव्हा -जेव्हा तुम्हाला खराब अनुभव येतील तेव्हां

 काय होईल याची चिंता कशाला करता! 

 काही झाले नाही तरी, तुम्हाला अनुभव तर नक्कीच येईल. 

जगन्नाथ खामकर

कोर कमिटी अध्यक्ष

भारतीय जवान किसान पार्टी

महाराष्ट्र राज्य

Related Post