योगासन स्पर्धेत महात्मा फुले नूतन महाविद्यालयाचे यश!

संघर्षनामा वृत्तसेवा - कर्जत

दि. 18 सप्टेंबर 2024

प्रतिनिधी - उज्वला उल्हारे

मिरजगाव : श्री संत गजानन महाविद्यालय खर्डा या ठिकाणी झालेल्या अहमदनगर जिल्हा अंतर महाविद्यालयीन योगासन क्रीडा स्पर्धेमध्ये महात्मा फुले नूतन महाविद्यालयाच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले. त्यामध्ये श्री.ओंकार देवकाते व श्री.ऋषिकेश मोहूडे यांची पुणे या ठिकाणी होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

         त्यांना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. राजेंद्रकुमार देवकाते यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रुरल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ए बी चेडे, उपाध्यक्ष डॉ. महेंद्र चेडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी व  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांनी खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Post