राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.१८सप्टेंबर २०२४

लिंपनगाव प्रतिनिधी,

स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा समाजाचे अराजकीय व्यासपीठ आहे कुणी कुठल्याही पक्षात रहा फक्त मराठा म्हणून स्वाभिमानी मराठा महासंघात सामील व्हा असे धोरण घेऊन संघटना देश पातळीवर काम करत आहे याच धर्तीवर स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक  पदी श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील भानुदास वाबळे पाटील  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती पत्र संघटनेचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले पाटील यांनी दिले

भानुदास वाबळे पाटील यांनी निवडी प्रसंगी सांगितले की, जी जबाबदारी आणि विश्वास माझ्यावर डॉ. कृषीराज दादा टकले पाटील यांनी माझ्यावर दिली त्या संधीचं प्रामाणिक पणे सोन करून दाखवेन.

संघटना आज देशात कामाच्या जोरावर अग्रेसर आहे मराठा समाजातील बेरोजगारी वाढत आहे समाजातील शेतकरी, तरुण आत्महत्या सारखे टोकाचे निर्णय घेत असल्याने मराठा आरक्षण समाजासाठी वाघिणीचे दूध आहे त्यामुळे संघटना मराठा आरक्षण मिळवणारच...

भानुदास वाबळे पाटील यांची राज्य निरीक्षक  पदी नियुक्ती झाल्याबद्दल स्वाभिमानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मराठा रामनारायण, राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह, राष्ट्रीय चिटणीस सलील सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दिपक पवार, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अनिता ताई पाटील,  प्रदेश कार्याध्यक्षा अमृता पठारे,  राष्ट्रीय अध्यक्ष कोकिळा ताई पवार, युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष अभिजित खैरे, प्रदेश कार्याध्यक्ष लखन घाडगे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रुपेश दळवी, दक्षता आघाडी प्रदेशाध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे सरकार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अलका सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिताताई जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष देवदत्त पोखरकर,पुणे शहर अध्यक्ष सवित खोजे, आदिंनी स्वागत केले आहे

Related Post