हुतात्मा राजगुरू स्मारकाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते उद्घघाटन.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.१३ सप्टेंबर २०२४

प्रतिनिधी,

खेड : राजगुरुनगर, खेड येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळी साकारल्या जाणाऱ्या भव्यदिव्य १५५ कोटी रुपयांच्या स्मारकाचे उद्घघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे हस्ते संपन्न झाले. स्मारकाशेजारी सैनिक भवन सुद्धा मंजूर करण्यात आले.

     याप्रसंगी खेड तालुक्याचे आमदार मा.श्री. दिलीप आण्णा मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष  दिपकराजे शिर्के, उपाध्यक्ष श्रीमंत राठोड, सरचिटणीस अमित मोहिते, संपर्क प्रमुख चंद्रकांत गायकवाड, ज्ञानेश्वर साखरे, सुनील ढाने, राजू नीकाडे, अशोक कुमार झा , रवी कापसे आदींसह शेकडो पदाधिकारी व देशभक्त उपस्थित होते.

Related Post