संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.१३ सप्टेंबर २०२४
प्रतिनिधी,
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामधील कनगर या गावांमध्ये ७ सप्टेंबर २०२४ रोजी मातंग समाजाच्या शेतकरी कुटुंबाला गावातीलच शेतीच्या वादावरून संपत गोसावी व गणपत गोसावी व त्यांच्या इतर साथीदारांनी अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण केली आहे. अक्षरशा स्त्रियांना तर रक्त भबाळ होईपर्यंत मारहाण केली आहे. यामध्ये जवळपास सहा आरोपी सहभागी आहे व ९ सप्टेंबर २०२४ रोजी सौ.संगीता राधाकिसन लाहुडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करूनही आज अखेर आरोपींना अटक झालेली नाही ही गोष्ट निषेधार्य असून आरोपींच्यावर कारवाई होण्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच संबंधित शेतकरी मातंग कुटुंबीयांना संरक्षण मिळावे या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देताना दलित महासंघाचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हा अध्यक्ष संजय चांदणे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष मंदाकिनी मेंगाळ, जिल्हा संपर्कप्रमुख कडूबाबा लोंढे, विजय वडागळे, चेतन वैराळ, चंद्रकांत सकट आदी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा दलित महासंघाच्या वतीने १३ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे.