आव्हाड महाविद्यालयात सांस्कृतीक विभागाच्या वतीने बाबूजींची यशोगाथा एकांकिकेचे सादरीकरण

पाथर्डी ​​​​​​​​​| संघर्षनामा न्युज 

(प्रतिनिधी) राजेंद्र चव्हाण - थोर स्वातंत्र्य सेनानी स्व. बाबूजी आव्हाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बाबुजी आव्हाड महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने बाबुजींची यशोगाथा या एकांकिकेचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले.
बाबुजी आव्हाड यांनी पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड कामगारांसाठी पार्थ विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि तालुक्यामध्ये उच्च शिक्षणाची गंगोत्री आणली. हजारो ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातामधील कोयता  बाजूला करण्याचे काम बाबुजींनी केले. यांचे हे ऐतिहासिक कार्य या नाटकाच्या माध्यमातून आजच्या युवापिढीपुढे मांडण्याचे काम  महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या  कलाकारांनी केले.
या नाट्य संहिता एकांकिकेचे लेखन प्रा.डॉ.अशोक डोळस यांनी केले, तर दिग्दर्शन प्राध्यापिका वैशाली आहेर ,डॉ.अजयकुमार पालवे  यांनी केले.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. नगराध्यक्ष अभयराव आव्हाड होते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ.जी .पी. ढाकणे, विलासकाका रोडी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात गीतगायनाने करण्यात आली. कार्यक्रमामध्ये  महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी मोरेश्वर तारे ,आदिती लोहकरे, सुवर्णा राठोड व अन्य कलाकारांनी आपल्या दर्जेदार अभिनयाने रसिकांची मने जिंकली.
गीत गायन कार्यक्रमामध्ये  अंकिता मर्दाने, आकांक्षा जोजारे, रूपाली दिनकर या विद्यार्थ्यांनीनी सहभाग घेतला तर संगीत प्रा. विजय कुमार म्हस्के ,प्रा.अनिल म्हस्के ,सम्राट डोळस, राजरत्न डोळस यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका वैशाली आहेर, डॉ.अशोक डोळस यांनी केले तर आभार डॉ. अजयकुमार पालवे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Related Post