स्व. बाळासाहेब विखेपाटील यांचे उपकार भुतेटाकळीकर कधीही विसरू शकत नाहीत - दादासाहेब फुंदे

पाथर्डी ​​​​​| संघर्षनामा न्युज 


(प्रतिनिधी) राजेंद्र चव्हाण - ​पाथर्डी तालुक्यातील भुतेटाकळी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय येथे लोकनेते स्व. बाळासाहेब विखेपाटील यांचा पाचवा पुण्यस्मरणचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब फुंदे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी १९९२ साली भुतेटाकळी येथे प्रवरा शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय सुरू करुन दिन-दलित, गोर-गरिब विद्यार्थांना शिक्षणाचे द्वार खुले करुन दिले. यामुळे गावातील अनेक जणांनी प्रशासकीय, शैक्षणिक क्षेत्रातमध्ये नाव कमावले आहे, बाळासाहेब विखे यांचे हे योगदान  भुतेटाकळीकर कधीही विसरू शकणार नाहीत.
प्रथमतः स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या पुण्यस्मरणाच्या प्रसंगी स्कूल कमिटीचे अध्यक्ष तथा मा.सरपंच सुर्यनारायण फुंदे, पंढरीनाथ फुंदे गुरुजी, ग्रा. पं. सदस्य रामनाथ फुंदे, मुख्याध्यापक प्रकाश तुपे, हरिभाऊ पाखरे, आजिनाथ टाकळकर, आसिफ पठाण, बाळासाहेब फुंदे, सुभाष सांगळे, अनिल फुंदे, अशोक खेडकर, अशोक भगत, रामकिसन फुंदे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आसिफ पठाण यांनी केले. बाळासाहेब फुंदे यांनी सुञसंचालन केले तर अजिनाथ टाकळकर यांनी आभार मानले.

Related Post