तर सुज्ञ सभासदच कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवतील - राजेंद्र नागवडे

श्रीगोंदा ​​​​​​| संघर्षनामा न्युज 

तर सुज्ञ सभासदच कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवतील - राजेंद्र नागवडे 

      काष्टी येथे जन संवाद मेळाव्यात विरोधकांचा राजेंद्र नागवडेकडून समाचार

      अजनुज( प्रतिनिधी) - आगामी कारखान्याच्या निवडणुकीत सहकार महर्षी बापूंनी मोठ्या कष्टातून उभारलेल्या सहकारी साखर कारखानदारी मुळेच श्रीगोंदा तालुक्यातील सभासद सर्वसामान्य शेतकरी आज ताठ मानेने उभा आहे. परंतु विरोधक राज्यात नावलौकिकास पात्र ठरलेल्या नागवडे कारखान्याला बदनाम करून बेताल आरोप करत आहेत. निश्चितच सुज्ञ सभासदच विरोधकांना त्यांची जागा दाखवतील असा गर्भित इशारा नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिला आहे.

      काष्टी येथे जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते  याप्रसंगी राजेंद्र नागवडे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत विरोधकांचे खोटे चेहरे जनतेसमोर आणले.

       यावेळी मार्गदर्शन करताना नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे पुढे म्हणाले की ,सहकार महर्षी बापूंनी श्रीगोंदा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रमाणिकपणे योगदान दिले .त्यामध्ये सहकार, शिक्षण, सिंचन क्षेत्रात श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला भरभरून आपले योगदान दिले. सहकारी साखर कारखानदारी चालवताना पन्नास-पंचावन्न वर्षे सक्षमपणे ही सहकार कामधेनु चालवली. आज सर्वसामान्य शेतकरी ऊस उत्पादक ताठ मानेने उभा आहे . म्हणूनच आतापर्यंत सभासदांनी बापूंवर विश्वास दाखवला. परंतु बापूंच्या निधनानंतर सहकारी साखर कारखानदारीची धुरा संचालकांनी माझ्या खांद्यावर दिली .परंतु आम्ही बापूंचे विचार डोळ्यासमोर ठेवून कारखान्याच्या सर्व संचालकांना विश्वासात घेऊन कारखान्याचे प्रशासन उत्तम प्रकारे सांभाळले. असे सांगून श्री नागवडे पुढे म्हणाले की,  कारखान्याचा चुकीचा कारभार केला असता तर एक संचालक वगळता 20 संचालक माझ्यासोबत राहिले असते का? असा सवाल करून ते पुढे म्हणाले की, जर माझ्याकडून काही चुकत असेल तर त्यांनी आमने सामने यायला हवे होते. नाहक विरोधकांनी बेताल तो चुकीचे आरोप करून सहकारी साखर कारखानदारी ची बदनामी सुरु केली आहे. डिस्टिलरी व कोजन प्रकल्प उत्तम प्रकारे पुन्हा सुरू केला आहे. आम्हीच बापूंचे वारसदार आहोत, असा डांगोरा तालुक्यात विरोधक पसरवत आहेत. याउलट विरोधकांनी बापूंचे स्मारक अनावरण समारंभास किती सभासदांना निमंत्रण दिले हा संशोधनाचा विषय आहे.

        असे सांगून नागवडे पुढे म्हणाले की, याउलट पवार साहेबांना याचं चांडाळ चौकडीनि कारखाना प्रशासनाची चुकीची माहिती देऊ अनावरण सोहळा हाणून पाडण्याचा डाव देखील केला होता .असे हे महाभाग मंडळी एकत्र येऊन बापूंनी कष्टातून उभारलेल्या कामधेनूला अडचणीत आणून राज्यातील नावलौकिकास पात्र असलेल्या या कारखानदारीला नागवडे कुटुंबांना निवडणुकीच्या या माध्यमातून वेगवेगळे आरोप करून बदनामी सुरु केली आहे. परंतु आता सभासदांनी या कारखान्याची निवडणूक हातात घेतलेली असून, सर्व विरोधक नेतेमंडळी एकत्र आलेले आहे. तर सभासद एकीकडे आहेत. परंतु सुज्ञ सभासद विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत. सर्व सभासद हे किसान क्रांती पॅनल च्या मागे खंबीरपणे उभे राहतील अशी अपेक्षा राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केली आहे

          या जनसंवाद मेळाव्यास जिल्हा परिषदेचे मा अध्यक्ष बाबासाहेब भोस, दीपक नागवडे, अरुणराव पाचपुते, विठ्ठलराव पाचपुते, युवराज चितळकर, कैलासराव पाचपुते, अनिलराव पाचपुते, राकेश पाचपुते, पै अजय रंधवे, शिवाजी पाचपुते, दिलीप चौधरी, प्रा सुनील माने, योगेश भोईटे, सुभाष शिंदे, प्रेमराज भोईटे ,छबुनाना कोकाटे ,आबासाहेब कोल्हटकर आदींसह काष्टीतील सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Post