माणिकदौंडीत १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण !

पाथर्डी ​​​​​​​| संघर्षनामा न्युज 

(प्रतिनिधी) राजेंद्र चव्हाण - पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील श्री रत्न जैन विद्यालयात ३ जानेवारी रोजी १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
कोविड-१९ विषाणु प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अंतर्गत १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची मोहिम केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सोमवार दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने माणिकदौंडी येथील श्री रत्न जैन विद्यालयात सुमारे १५३ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला. दुसरा डोस २८ दिवसांनी देण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता लसीकरणात प्रारंभ होऊन १:३० वाजेपर्यंत १५ ते १८ वयोगटातील सर्व १५३ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.
या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र माणिकदौंडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपाली खेडकर, डॉ. शुभांगी खाडे, सुनील बडे, बाळासाहेब टेकाळे, शिवाजी बडे, प्रियांका फुंदे, अंजली कुलकर्णी, आशा बडे, नजमा पठाण यांनी मोलाचे सहकार्य केले.
तसेच या विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम माळी, पर्यवेक्षक अनिल पटवा, ज्येष्ठ शिक्षक सूर्यभान दहिफळे, नवनाथ बुचकुल, लक्ष्मण आरणे, अविनाश नरवडे, संजय राठोड, प्रदीप कीर्तने, सुमित फलके, राजेंद्र चव्हाण, समाधान आराख, प्रशांत रक्ताटे, महावीर कर्नावट, संदीप खेडकर, अनिता घोलप, सुधा खामकर, संगीता मोरे, करूणा कोकाटे, निलेश साखरे, शहादेव कसबे आदी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Post