जे कारखान्याच्या बैठकीला गैरहजर असतात त्यांना कारखाना चालवायचा कसे कळणार - राजेंद्र नागवडे

पाथर्डी ​​​​​| संघर्षनामा न्युज 

अजनुज ( प्रतिनिधी :)
सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ किसान क्रांती मंडळाच्या वतीने कोळगाव येथील माऊली मंदिरात मतदार सभासदांचा मेळावा आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी  जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस होते.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे म्हणाले की,जे कारखान्याचे मिटींगला वारंवार गैरहजर राहतात, ज्यांना कारखान्याचा कारभार कसा चालला आहे हे प्रत्यक्षात माहिती नाही, ज्यांनी कारखान्याचा अभ्यास कधीही केलेला नाही,  हे आम्हाला विचारतात कारखान्यात एवढा बग्यास शिल्लक आहे ,तर कारखाना ब गॅस वर चालू शकत नाही का? कारखाना चालू करण्यासाठी लाकूड लागते की ब गॅस लागतो हे ज्यांना अजुन माहिती नाही. त्यांनी अगोदर माहिती करून घ्या मगच आमच्यावर टीका करा. असे अण्णासाहेब शेलार यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.कारखान्याचे गेली दोन वर्ष सहवीज प्रकल्पाचे काम चालू आहे. तेथे पाच कामगार दिवस-रात्र काम करतात. त्यांना आठ लाख रुपये खर्च झाला आहे.महाराष्ट्र मध्ये सर्वात प्रथम 12 टक्के पगारवाढ कामगारांना दिली. या कामगारांचे कसलेही प्रकारचे वेतन थकीत नाही हे सर्व संचालकांच्या डोळ्यासमोर व संमतीने झालेले आहे. सर्वांच्या संमतीने वेगवेगळी बिले अदा केलेले आहेत असे असतानाही केवळ विरोध करायचं म्हणून  विरोध करत आहेत. त्यांना सर्व माहिती आहे. असे सांगून नागवडे यांनी विरोधकांची पोलखोल केली.
केशव मगर हे स्व. बापूंच्या बरोबर काम करीत होते. त्यावेळी कारभार चांगला चालला होता, सर्वजण योग्य रीतीने साथ देत होते, त्यावेळी स्व.बापूंनी राहुलदादा जगताप यांना आमदार करण्यासाठी शब्द दिला. आम्ही कारखान्याच्या सत्तेवर असताना स्व.बापूंच्या नंतर बबनराव पाचपुते यांना आमदार करण्यासाठी मदत केली. केशव भाऊंची महत्त्वकांक्षा लपून राहिलेली नव्हती, त्यांनाही वाटत होते की, कारखान्याचे आपण चेअरमन व्हावे. स्वतःच्या महत्वकांक्षी पायी ज्यांनी विधानसभेला आमदार पाचपुते यांचे काम केलं नाही, मदत केली नाही आता तेच  पाचपुते यांना मदत करण्याचा आव आणीत आहेत. मग त्या वेळेला का विरोध केला होता? आता दोघे एकमेकांचा पाठिंबा का घेत आहे, याचे उत्तर प्रथम विरोधकांनी द्यावे.  यांना चेअरमन होण्याची स्वप्न पडलेले आहेत. यांना लोकांसाठी काही करता येत नाही, केले नाही यांच्याकडे कसले प्रकारचे कारखाना चालविण्याचे नियोजन नाही असा जोरदार हल्ला चढवला.
श्रीगोंद्याच्या सभापती उपसभापती निवडीच्या वेळी किती आर्थिक उलाढाली झाल्या हे सगळे तालुक्याला माहिती आहे, असे असतानाही आमच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे रान पेटवायचे आपण खूप धुतल्या तांदळासारखे आहेत असे भासवायचे, आपली निष्ठा कशी आणि किती आहे ते तालुक्यातील जनतेला चांगले माहिती आहे अशी टीका संचालक जिजाबापू शिंदे यांच्यावर केली.नगर जिल्ह्यातील राहुरी, पारनेर, कर्जत, नगर तालुका हे कारखाने निट चालवले गेले नाही म्हणून हे कारखाने डबघाईस आले. विरोधकांना एकदा कारखाना चालवण्यासाठी दिला होता पण त्यांनी कारखान्याचे काय वाटोळे केले हे जनतेने पाहिले आहे .सर्वात प्रथम 2600 रुपये श्रीगोंदा कारखान्याने उसाचा भाव जाहीर केला. त्यातील 2250 रुपये सभासदांना पहिली उचल दिली. कारखान्याला ऑडिट अ वर्ग मिळालेला आहे. जी संस्था व्यवस्थितरित्या चालते त्याच संस्थेला अ वर्ग मिळतो हे साधं गणित विरोधकांच्या लक्षात येत नाही. कारखान्याकडे कोणाचेही थकित बिल नाही. आम्ही वैयक्तिक कारखाना काढला. परंतु श्रीगोंदा कारखाना मध्ये कोणत्याही कामगारांचे एक रुपया बील ठेवलेले नाही, एक रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही, तरी मग विरोधक आमचा खासगी कारखाना श्रीगोंदा कारखाने कडे दुर्लक्ष करून जोरात चालू आहे हे कशाच्या जोरावर बोलत आहे.
नागवडे पुढे म्हणाले की सध्या कारखान्याचे आठ लाख गळीत आहे. जर हाच कारखाना 11 ते 14 लाखापर्यंत गळीत करू लागला तर सोमेश्वर कारखाना पेक्षाही जास्त शंभर रुपये भाव जादा मी देईल, हे जाहीररीत्या या ठिकाणी सांगत आहे. शेतकरी सभासदांनी आपली उसाचे उत्पादन क्षमता वाढवावी, कमी क्षेत्रामध्ये जास्त  उत्पादन घ्यावे, पर्यायाने गळीत वाढ  होईल व जास्त भाव देता येईल असे आश्वासन नागवडे यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक हेमंत नलगे यांनी केले तर ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, डी एल सरोदे यांनी आपले विचार व्यक्त केले. या मेळाव्यास  , कारखाना संचालक  राकेश पाचपुते, योगेश भोयटे  ज्येष्ठ नेते शंकरराव लगड तसेच  विजय लगड, मच्छिंद्र नलगे, विश्वास थोरात, नितीन डूबल, सुभाष लगड, सुधीर लगड, ग्रामपंचायत सदस्य विजय नलगे,अमित लगड,पंकज उजागरे,चंद्रकांत काटे, लक्ष्मीकांत लगड,विनायक लगड,प्रशांत नलगे, सुनील नलगे,अनिल लगड, बी. जे. नलगे, सामाजिक कार्यकर्ते कल्याणराव नलगे उपस्थित होते
.चौकट सध्या कारखान्याचे ८ लाख गळीतत आहे हाच कारखाना  १४  लाखापर्यंत गळीत करू लागला  तर सोमेश्वर पेक्षा शंभर रुपये जादा भाव मी देईल शेतकरी सभासदाने उत्पादन क्षमता वाढवावी कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घ्यावे पर्यायाने गळीत वाढ होईल व जास्त भाव देता येईल  

 राजेंद्र नागवडे श्रीगोंदा साखर कारखाना अध्यक्ष. 

 कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे म्हणाले की,जे कारखान्याचे मिटींगला वारंवार गैरहजर राहतात, ज्यांना कारखान्याचा कारभार कसा चालला आहे हे प्रत्यक्षात माहिती नाही, ज्यांनी कारखान्याचा अभ्यास कधीही केलेला नाही,  हे आम्हाला विचारतात कारखान्यात एवढा    बगॅस  शिल्लक आहे ,तर कारखाना ब गॅस वर चालू शकत नाही का? कारखाना चालू करण्यासाठी लाकूड लागते की ब गॅस लागतो हे ज्यांना अजुन माहिती नाही. त्यांनी अगोदर माहिती करून घ्या मगच आमच्यावर टीका करा. असे अण्णासाहेब शेलार यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.

Related Post