स्व.कुशिवर्ता राधाकिसन जायभाये यांच्या दुःखद निधनाने जायभाये कुटुंबांना मातृशोक...

पाथर्डी ​। संघर्षनामा न्युज 

     (प्रतिनिधी) राजेंद्र चव्हाण - पाथर्डी तालुक्यातील जिरेवाडी (मुळगाव) येथील आदर्श शिक्षक बाबासाहेब जायभाये यांच्या मातोश्री कुशिवर्ता राधाकिसन जायभाये (वय ७३) यांचे मंगळवार दि. २१ डिसेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्यावर गेल्या महिन्यापासून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल विळदघाट, अहमदनगर येथे उपचार चालू होते. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
 अध्यात्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कुशिवर्ता जायभाये यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या दोन पिढ्यापासून अध्यात्माचा वारसा या कुटुंबास लाभला आहे, तोच वारसा त्यांची मुलगी व मुलगा देखील हा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत. अत्यंत गोड व मनामिळावू स्वभाव असलेल्या आईच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.
आदर्श शिक्षक बाबा जायभाये यांचे राजकीय, अध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटून सांत्वन केले आहे. कै. सौ.कुशिवर्ता जायभाये यांचा दशक्रिया विधी गुरुवार दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी खंडोबा मंदीराजवळ, जिरेवाडी ता. पाथर्डी येथे होईल. या प्रसंगी ह.भ.प. रामगिरी महाराज (येळी) यांचे किर्तन ९ ते ११ या वेळेत होईल.

Related Post