जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले, उतराई म्हणून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन - अभय आव्हाड

पाथर्डी ​। संघर्षनामा न्युज 

     (प्रतिनिधी) राजेंद्र चव्हाण -  पाथर्डी शहरातील फुलेनगर येथे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या स्थानिक निधीतून व  माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
धामणगाव चौक ते महादेव मंदिरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, फुलेनगर येथील रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसविणे या कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. 
याप्रसंगी मा. नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी शहरवासियांना विकासाची ग्वाही दिली. फुलेनगर, भगवाननगर तसेच पाथर्डी शहरातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. या प्रेमातून उतराई होण्यासाठी तसेच यापुढेही या शहराचा विकास करण्यासाठी कायम कटिबद्ध राहू, असे आश्वासन अभय आव्हाड यांनी दिले व सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 
यावेळी गोरक्ष शिरसाठ, शिवाजी खेडकर, उमाजी काकडे, नारायण बडे, रशिदभाई शेख, रामनाथ फुंदे, सुभाष खेडकर, सुरेश मिसाळ, संजय इधाटे, मुरलीधर शिंदे, रामराव बडे, सुरेश इजारे, सूर्यभान दहिफळे, आदित्य इधाटे, अजिंक्य खेडकर, नामदेव खेडकर, बबन सबलस, दत्ता सोनटक्के, गणेश टेके, किशोर परदेशी, इजाजभाई शेख, पप्पूशेठ नरवणे, प्रशांत शेळके, ज्ञानेश्वर कोकाटे,  जायभाये मेजर, गोल्हार सर, सुदर्शन खेडकर, सानप, ओम दहिफळे, भोईटे, नामदेव खेडकर तसेच प्रभागाचे नगरसेवक प्रसाद आव्हाड व दुर्गाताई भगत आदी उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण खेडकर यांनी केले तर आभार रामनाथ फुंदे यांनी मानले.

Related Post