राष्ट्रीय महामार्ग ६१ निबंध स्पर्धेचा निकाल घोषित !

पाथर्डी ​​​​​| संघर्षनामा न्युज 


(प्रतिनिधी) राजेंद्र चव्हाण - राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ बाबत अपेक्षा आणि वास्तव या विषयावर आयोजित खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. तसेच या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीदिनी घेण्यात येणार असल्याची माहिती पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी दिली.
  गेली पाच- सहा वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६१ या विषयावर आयोजित खुल्या निबंध स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील सर्व मिळून ६३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धकांनी ५ ते ६ वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६१ बद्दल अतिशय योग्य तीव्र भावना लिहून व्यक्त केल्या आहेत. आणि सर्व स्पर्धकांनी सुध्दा हा ५ ते ६ वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६१ लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी विनंती केली आहे. सर्व निबंध हे पंतप्रधान कार्यालयात आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात येणार आहे.
खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे -

  •  प्रथम क्रमांक विभागून -

अ- डॉ. अरविंद संतोष नागरे, वामनभाऊ नगर,पाथर्डी.
ब- साहिल अय्युब पठाण
आसरा नगर,पाथर्डी.
क- आश्विनी वेदप्रकाश काळे अकोले,पाथर्डी
ड-गायत्री अजय साठे
कसबा पेठ, पाथर्डी.
द्वितीय क्रमांक विभागून-
अ-झरीना अकबर शेख
पाथर्डी, ब-ऋषिकेश आदिनाथ शिरसाट
चिंचपूररोड, पाथर्डी.
क-गौरव बाळासाहेब गर्जे
दुले चांदगाव, पाथर्डी
तृतीय क्रमांक विभागून-
अ-नेहा कृष्णा डोईजड
आखारभाग, मेन रोड, पाथर्डी.
ब-आकांक्षा पोपट घुले
आनंद नगर ,पाथर्डी.
क-गोविंद सोमनाथ बंग
गांधी चौक, पाथर्डी.
या स्पर्धेच्या बक्षिस वितरणचा कार्यक्रम स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने १२ जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्ताने सकाळी ११ वा. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम अतिथी मंगल कार्यालय, गर्जे कॉम्प्लेक्स, पाथर्डी या ठिकाणी होणार आहे.
निबंध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचे तसेच सहभागी स्पर्धकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे..

Related Post