अबब ..योगराज टिव्हीस शोरूम मध्ये आगीचे तांडव लाखोंचा माल जळून खाक...

दौड ​​। संघर्षनामा न्युज 

   प्रतिनिधी - अहमदनगर-दौड रोडवरील नगरमोरी दौड येथील योगराज टिव्हीएस शोरूम व हॉटेल ला आज अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे स्पेअर पार्ट जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
 याबाबत मिळालेली माहिती अशी की अहमदनगर- दौड रोडवरील दौड येथील नगरमोरी याठिकाणी प्रसिद्ध व प्रशस्त हॉटेल योग राज व शेजारीच योगराज टिव्हीएस कंपनी च्या गाड्याचे शोरूम आहे.

शोरूम च्या मागील बाजूस वर्कशॉप  स्पेअर पार्ट चे शोरूम आहे.आज सुमारे साडे आठ वाजण्याच्या सुमारास शोरूम मधून जाळ निघत असलेला हॉटेल मधील कर्मचारी यांच्या लक्षात आले.

शोरूम ला कुलूप असल्याने व आग वर्कशॉप मध्ये लागलेली लक्षात आल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले परंतु आग इतकी भयानक होती अग्निशमन ची गाडी येईपर्यंत हॉटेलच्या स्वयंपाक घरापर्यत आग पसरली.

आगीचे रौद्र रूप पाहून हॉटेल मधील सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले.आगीत जीवित हानी झाली नसली तरी स्पेअर पार्ट,ऑईल सर्व जळून खाक झाले सुमारे 50 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

ही आग कशामुळे लागली याचे कारण आद्यप समजले नसले तरी शॉक सर्किट मुळे आग लागली असण्याची शक्यता प्रथम दर्शनी दिसत आहे.

हे हॉटेल व शोरूम नागवडे कारखान्याचे माजी चेअरमन केशवराव मगर यांचे आहे.

Related Post