दत्तात्रय उढाणे भाऊ यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा !

आष्टी ​​​​​​| संघर्षनामा न्युज 

अण्णासाहेब साबळे(प्रतिनिधी) - पिंपरी (घुमरी)येथील सामाजिक,आध्यात्मिक आणि कृषी क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व दत्तात्रय उढाणे भाऊ यांनी वयाची ७५ वर्षे पुर्ण केली.त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला...आष्टी तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा सांगवी(पा) आणि जि.प.प्रा.शाळा पिंपरी(घुमरी) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ  वाटप करण्यात आला.तसेच उढाणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त जि.प.प्रा.शाळा लमाणतांडा येथील विद्यार्थ्यांनाही वह्या वाटप करण्यात आल्या. समाजिक,आध्यात्मिक,शैक्षणिक कार्याची आवड असल्यामुळे आवांतर खर्चाला फाटा देवून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यास  प्राधान्य दिले.त्यांचे सुपूत्र अशोक उढाणे एक आदर्श शिक्षक,उत्कृष्ट सुत्रसंचालक म्हणून प्रसिध्द आहेत...स्वातंत्र्याच्या दरम्यानच्या काळात ग्रामिण भागात शिक्षणाचा जास्त प्रसार नसतानाही भाऊंनी खुंटेफळ येथील थोरवे दादांच्या शाळेमध्ये आपले शिक्षण घेतले,नंतर आदरणीय थोरवेदादांच्या सहवासात सामाजिक कार्याचीही संधी मिळाली.वडिल आप्पासाहेब उढाणे हे मुंबई येथे गोदी मध्ये नोकरीला होते,नंतर त्यांनी नोकरी सोडून गावी शेती करणेच पसंद केले.त्या काळात जेमतेम शिक्षणावरच नोकरी लागत असतानाही भाऊंनी नोकरी न स्विकारता उत्तम शेती मानून शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवून कृषी क्षेत्रात नावलौकिक मिळवला.बंधु आंबादास उढाणे हे पाटबंधारे विभागात उच्च पदस्थ अधिकारी  होते.दोन्ही भावांचा फार मोठा एकविचार होता,एकत्रित कुटुंबाचे  एक आदर्श उदाहरण म्हणजे हा परिवार होता,बंधुत्वाच्या नात्याची एक मनमोहक जोडी म्हणून परिसरात ओळखली जाते. निमगाव गांगर्डा येथील सिना धरणाचे काम चालू असताना भाऊंचा अपघात झाला,सहा महिने पुणे येथील ससून रूग्णालयात उपचार सुरू होते.डॉ.भापट यांचे अथक प्रयत्न,बंधु आंबादास यांची साथ,आईवडिलांचे आशीर्वाद तसेच शरीर काटक आणि पिळदार असल्यामुळे त्या संकटावर भाऊंनी लिलया विजय मिळवला.आजही भापट डाॅक्टरांना भाऊ  देवरूपामध्ये पाहतात.यामधुन सावरत असतानाच अर्धांगीनी मंडुबाई तसेच जिवलग बंधू आंबादास
 यांनी जगाचा निरोप घेतला परंतु खचुन न जाता एका संघर्ष योद्ध्याप्रमाणे मुलीमुलांचे शिक्षण पुर्ण करून कुटूंबाची व्यवस्थित घडी बसवली.अत्यंत मनमोकळे,सुस्वभावी असणारे भाऊ आजही  कुटूंबातील एक मार्गदर्शक,दिशादर्शक म्हणून महत्वाची भुमिका निभावतात...जीवनामध्ये कितीही संकटे आली तरी जिध्द,चिकाटी आणि धैर्याने त्यांचा सामना करण्याचा मंत्र देणारे भाऊ आजही पहाटे ऊठून योगा,गीता वाचन ज्ञानेश्वरी वाचन,हरिपाठ,देवीचे गाणे अशा अनेक कलामय गुणांसह आनंदी जीवनाचा लाभ घेत आहेत... भाऊंना वाढदिवसानिमित्त अनेक प्रशासकिय,राजकिय, आध्यात्मिक,शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नातेवाईकांनी शुभेच्छा दिल्या.भावी आरोग्यसंपन्न जीवन आणि वयाचा शतक महोत्सव साजरा करण्याची संधी आम्हास मिळावी या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भाऊंना शुभेच्छा!!

Related Post