ऊस तोडणीची टोळी नका देवू पण कांदा लागवडीसाठी टोळी द्या म्हण्याची आली बळीराजावर वेळ...

श्रीगोंदा ​​​​| संघर्षनामा न्युज 

अजनुज प्रतिनिधी - सध्या श्रीगोंदा तालुक्यात ऊस तोडणीचा हंगाम आणि कांदा लागवडीचा हंगाम बरोबरच सुरू झाला असून आता बळीराजा ऊस तोडणी टोळी ऐवजी आता आम्हाला कांदा लागवडीसाठी टोळी द्या अशी म्हणण्याची वेळ आली आहे.या वर्षी ऊस पट्ट्यात बऱ्याच पैकी कांदा लागवडी होत असून बळीराजाचा कल कांदा पिकाकडे आहे.एक दोन महिन्या पुर्वी बरीच कांद्याची रोपे नष्ट झाली असून पुन्हा बळीराजाने कांदा बी टाकल्याने सर्वांची लागवडीसाठी आलेली रोपे त्यातच एक आठवडा दिवसा वीज असल्याने जो तो कांदा लागवडीसाठी लगबग करत आहे.
जिथे महिला उपलब्ध होतील तेथून कांदा लागवडीसाठी आणल्या जात आहेत.सध्या तरी एकरी नऊ हजार रुपये आणि टमटमसाठी एक हजार रूपये भाडे दयावे लागत आहे.कांदयाला बुरशीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बुरशीनाशक औषधे लावून कांद्याच्या वाफ्यावर पोहच करावी लागत आहे.आता कांदा घेण्यासाठी बळीराजा जीवाचा आटापिटा करत आहेत पण कांद्याला चांगला बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा मात्र बाळगून आहे.अशी लागवडीसाठी टोळी दया म्हणण्याची वेळ कधीच वेळ आली नव्हती.

Related Post