लिंपणगाव शेंडेवाडी येथील जुन्या पिढीतील वयोवृद्ध कार्यकर्ते भिमाजी शेंडे यांचे निधन !

श्रीगोंदा । संघर्षनामा न्युज 

         लिंपणगाव (प्रतिनिधी) - श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव कार्यक्षेत्रातील शेंडेवाडी येथील जुन्या पिढीतील वयोवृद्ध विचारवंत कार्यकर्ते भिमाजी बाबुराव शेंडे वय( 90) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. कै भिमाजी शेंडे हे अत्यंत संयमी व शांत स्वभावाचे होते. लिंपणगाव परिसरातील ते चालते बोलते ग्रामीण कोर्ट म्हणून त्यांच्याकडे सर्वजण पाहत होते. गाव परिसरातील विविध कारणावरून भाऊबंदकी तसेच विविध जाती धर्मातील लोकांमध्ये आपापसात होणारी भांडणे त्यांनी त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत जागच्या जागेवरच मिटवणेमध्ये त्यांचा हातखंडा होता. लिंपणगाव ग्रामपंचायतीचे त्यांनी काही काळ सदस्य म्हणूनही काम पाहिले होते. मुळातच त्यांना बालपणापासूनच सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. आणि त्यांनी अखेरपर्यंत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे मौलिक काम पार पाडले. विविध जाती धर्माचे भांडणे त्यांनी कोर्टकचेरी पर्यंत जाऊ दिले नाहीत .त्यामुळे लिंपणगाव परिसरातील ग्रामस्थांनी त्यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त केला होता. त्यांच्या अचानक निधनाने एक जुन्या पिढीतील विचारवंत हरपल्याची भावना लिंपणगाव परिसरात होत आहे. तशा प्रतिक्रिया देखील गाव परिसरातील जनतेने व्यक्त केले आहेत. त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना नातवंडे  असा मोठा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर मूळ गावी शेंडेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता ते लिंपणगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जयसिंग शेंडे यांचे वडील होत.

Related Post