हक्काचा पगार मिळावा यासाठी उतरत्या वयात आंदोलन करण्याची आली वेळ...

श्रीगोंदा ​​​​​​​​| संघर्षनामा न्युज 

 अजनुज प्रतिनिधी - गेली २० वर्षा पासून विनावेतन पवित्र अशा ज्ञानदान क्षेत्रात पोटाला चिमटा घेऊन कार्य करीत असलेल्या शिक्षकांवरती उतरत्या वयात आंदोलन करण्याची आली वेळ. आता जाता जाता तरी एखादा तरी पगार मिळावा म्हणजे या शिक्षण क्षेत्रात आल्याचे सार्थक होईल असे वाटत आहे. ज्या अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व नैसर्गिक वाढिव तुकड्या या शिक्षक संचालक स्तरावर पात्र झाल्या असून त्या आता मंत्रालय स्तरावर जावून त्या निधीसह घोषित होवून लवकरच हक्काचे पगार मिळावेत यासाठी २० डिसेंबर २०२१ पासून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू झाले असून आज बारा दिवस झाले आहेत. शासनाने मात्र शिक्षकांच्या वयाचा त्याच बरोबर शाळेच्या वयाचा विचार करून तात्काळ अनुदान दयावे अशी मागणी आता महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून शिक्षकामधून निघत आहे. यातच काही शिक्षक सहा महिन्यांत निवृत्त होत असून काही शिक्षक बांधव तीन चार वर्षांत निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने शिक्षकांच्या परिस्थितीचा त्यांच्या कुटुंबाचा विचार करून तात्काळ अनुदान देवून त्यांना आधार दयावा. अशा वयात आंदोलन अथवा उपोषण करण्याची वेळ येवू देवू नये अशी मागणी आता होत आहे.

Related Post