जुन्या पेन्शन साठी वांगदरीच्या आंबीकादेवी मातेला साकडे - शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप

श्रीगोंदा । संघर्षनामा न्युज 

         लिंपणगाव (प्रतिनिधी) - जुनी पेन्शन योजना लागू व्हावी  या मागणीसाठी    शिक्षक भारती संघटना अहमदनगर यांच्या वतीने वांगदरी गावचे ग्रामदैवत आंबीकादेवी माता चरणी  जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब जगताप व सह प्रसिद्धी  प्रमुख सचिन शेलार यांनी महाअभिषेक घातला. याप्रश्नी  जुनी पेन्शन योजना मागणी मान्य होण्यासाठी साकडे घातले.  
          महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन शिक्षण संघर्ष समितीच्या  राज्य अध्यक्ष संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ( ता २७ ) मुंबईत सार्वजनिक आत्म दहन आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास जिल्हाध्यक्ष  आप्पासाहेब जगताप ,राज्य सचिव सुनील गाडगे, सचिन शेलार ,सुदाम दिघे, हनुमंत रायकर, महेश पाडेकर, रामदास फटाकडे, कैलास जाधव, सिकंदर शेख, संजय भुसारी, संतोष शेंदुरकर ,अशोक अन्हाड, विजय कराळे, गंगाराम खोमणे, सतीश जामदार,  विलास वाघमोडे महादेव कोठारे शंकर भिवसने  विलास माने,  संभाजी पवार, संजय तमनर ,बाळासाहेब तांबे ,नवनाथ घोरपडे,  संतोष मगर ,नानासाहेब काटे, मुकुंद आंचवले, गोवर्धन रोडे आदींनी पाठिंबा दर्शवला.

Related Post