श्रीगोंदा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ,सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे हरवलेले मोबाईल नागरिकांना परत

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . २० मे २०२६

श्रीगोंदा | प्रतिनिधी

श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हरवलेले नागरिकांचे सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे मोबाईल शोधून त्यांचे मूळ मालकांना परत करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. या उल्लेखनीय कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि विशेष पथकाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर विविध ठिकाणांहून मोबाईल हस्तगत करून1) अश्विनी राजेंद्र खेडकर रा. बेलवंडी स्टेशन, ता. श्रीगोंदा2) दत्तात्रय ज्ञानदेव दरेकर रा. हिरडगांव, ता. श्रीगोंदा3) प्रतिक कैलास पारधे, रा. सुरोडी ता. श्रीगोंदा4) अनिल ज्ञानदेव प्रधान रा. वाघोली, पुणे5) रोहन पोपट वडवकर, रा. वेळ, ता.श्रीगोंदा6) अरबाज अब्दुल रज्जाक मन्यार, रा.लोणी बुद्रुक7) बबन तुकाराम सांगळे, रा. पारगांव सुद्रिक, ता. श्रीगोंदासंबंधित नागरिकांना परत देण्यात आले.

अनेक दिवसांपासून हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने  मोबाईल धारकांनी ,नागरिकांनी श्रीगोंदा पोलिसांचे आभार व्यक्त केले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मुमुक्का सुदर्शन ,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल सचिन गोरे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत हरवलेली मालमत्ता शोधून परत देण्याचे काम श्रीगोंदा पोलीस सातत्याने करत असून, यामुळे पोलीस दलाबद्दल नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे

Related Post