शिर्डी येथे एसबीआय लाईफ राज्य अधिवेशनात पत्रकार नीलम खोसे पाटील यांना गोल्ड मेडल पुरस्कार

संघर्षनामा वृत्तसेवा । पारनेर

दि . १२ फेबुवारी २०२६

निघोज प्रतीनिधी,

शिर्डी येथे आयोजित स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या लाईफ अॅडव्हायझर, गुंतवणूक सल्लागार तथा लाईफ मित्रांच्या राज्यस्तरीय भव्य अधिवेशनात महिला पत्रकार तथा लाईफ मित्र नीलम खोसे पाटील यांचा गोल्ड मेडल देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

एसबीआय लाईफसाठी उत्कृष्ट कामगिरी करत ग्राहकांमध्ये विमा व गुंतवणूक विषयक जनजागृती, विश्वासार्ह सेवा आणि सातत्यपूर्ण कार्य याबद्दल त्यांची निवड या मानाच्या पुरस्कारासाठी करण्यात आली. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राज्याचे वरिष्ठ अधिकारी मा. रवि जगताप सर यांच्या हस्ते त्यांना गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. तसेच जिल्ह्याचे वरिष्ठ गुंतवणूक व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

या राज्यस्तरीय अधिवेशनाला महाराष्ट्रातील सुमारे ९ हजार लाईफ मित्र उपस्थित होते. कार्यक्रमात विविध यशस्वी लाईफ अॅडव्हायझर्सचा सत्कार, मार्गदर्शन सत्रे व प्रेरणादायी अनुभव कथन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश खोसे पाटील, ईश्वरी वैद्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नीलम खोसे पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पत्रकारिता आणि आर्थिक सल्लागार या दोन्ही क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत समाजात आर्थिक सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या नीलम खोसे पाटील यांच्या या यशामुळे जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Post