संघर्षनामा वृत्तेसेवा । श्रीगोंदा
दि .२४ फेब्रुवारी २०२६
प्रतिनिधी ,
श्रीगोंदा तालुक्यातील २५० एकल महिला आपले दुःख विसरून एकत्र आल्या...आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा त्यांनी संकल्प केला...निमित्त होते रोजगार प्रेरणा कार्यशाळेचे आणि आरोग्य शिबिराचे...या महिलांना आरोग्य तपासणी रोजगार मार्गदर्शन, आयुष्यमान कार्ड आणि जाताना विविध डाळीचे कीटची भेट यामुळे एकल महिलांमध्ये आत्मभान जागे झाले ...उमेद च्या माध्यमातून या महिलांनी रोजगार सुरू करण्याचे ठरवले.
निमित्त होते
साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र राज्य,पंचायत समिती श्रीगोंदा
जगदंब फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा तालुक्यातील एकल महिलांसाठी उद्योजकता विकास मेळावा आणि आरोग्य शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन.
श्रीगोंदा तालुक्यातील एकल महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये एकल महिलांनी वैयक्तिक उद्योग व्यवसाय सुरू करावे याबाबत साऊ महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी शेतीवर आधारित व बिगर शेती आधारित कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय महिलांना करता येऊ शकतात याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले तसेच भविष्यात एकल महिलांना व्यवसाय वाढीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर महिलांना येणाऱ्या कायदेविषयक अडचणी बाबत सदैव तत्पर असल्याचे सांगण्यात आले. उमेद बचत गट हेच एकल महिलांच्या रोजगाराचे उत्तर असल्याने महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून रोजगार सुरू करावेत असे आवाहन केले
पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी पंचायत समितीच्या उमेद अभियाना मार्फत चालवल्या जाणाऱ्या शासकीय बचत गटामध्ये जास्तीत जास्त एकल महिलांनी समाविष्ट व्हावे व शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा तसेच पंचायत समिती च्या महिला संरक्षण विभागामार्फत असलेल्या बालसंगोपन योजनेचा जास्तीत जास्त एकल महिलांच्या पाल्यांना उपयोग व्हावा यासाठी योजनेची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीगोंदा तहसीलचे तहसीलदार सचिन डोंगरे यांनी तहसील विभागामार्फत विधवा पेन्शन संजय गांधी निराधार योजना रेशन कार्ड वरील नोंदी कमी करणे तसेच नोंदी लावणे याबाबत तहसील विभाग कायम तत्पर राहील याबाबत एकल महिलांना आश्वासन दिले. तालुका आरोग्य अधिकारी शैलजा डांगे मॅडम यांनी एकल महिलांच्या आरोग्य विषयी तसेच एकल महिलांना येणारे अडचणी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या दरम्यान आरोग्य विभागाकडून महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली यामध्ये शुगर रक्तदाब कॅन्सर इत्यादी आरोग्याच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या.
पंचायत समितीच्या उमेद विभागाचे तालुका व्यवस्थापक राहुल अडागळे यांनी एकल महिलांनी बचत गटात आल्यावर महिलांना कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळू शकतो याची सविस्तर माहिती दिली यामध्ये बँकेच्या विविध कर्जाच्या योजना बचत गटाच्या योजना याच्या माध्यमातून एकल महिलांचे व्यवसाय कसे वाढतील याबाबत मार्गदर्शन केले. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प श्रीगोंदा व बेलवंडी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती वर्षा खेतमाळीस यांनी आयसीडीएस विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सुमारे २५० महिलांना साऊ एकल महिला समिती मार्फत वेगवेगळ्या पोषक डाळींचे किट वाटण्यात आले.. महिला स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात आहारात डाळींचे प्रमाण कमी असते हे त्यांच्या प्रतिकात्मक रित्या लक्षात आणून देण्यासाठी डाळी देण्यात आल्या
या कार्यक्रमाचे श्रीगोंदा येथील महामानव डॉ . बाबासाहेब आमटे या सामाजिक संस्थेचे विकास पाटील यांनी उत्तम नियोजन केले...संस्थेच्या शुभांगी झेंडे यांनी एकल महिलांनी दुःखातून बाहेर येत स्वतःच्या पायावर उभे राहावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक राहुल साळवे यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते व खांडगाव चे उपसरपंच राम घोडके यांनी तहसीलदार सचिन डोंगरे यांचा सत्कार व स्वागत केले
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन राराणी फराटे गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी हेरंब कुलकर्णी अध्यक्ष साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र राज्य, सचिन डोंगरे तहसीलदार श्रीगोंदा, राणी फराटे गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा, वर्षा खेतमाळीस बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीगोंदा, शैलजा डांगे तालुका आरोग्य अधिकारी श्रीगोंदा, शुभांगी झेंडे संचालक महामानव बाबा आमटे विकास संस्था श्रीगोंदा, मोहन कांडेकर युथ एड फाउंडेशन अहिल्यानगर, राहुल साळवे राहुल आडागळे तालुका व्यवस्थापक उमेद पंचायत समिती श्रीगोंदा, संदीप गाढवे, कृष्णा सरगर, दत्ता राखुंडे, ऋषिकेश रंधवे प्रभाग समन्वयक उमेद पंचायत समिती श्रीगोंदा, श्रीमती थोरात मॅडम एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, राम घोडके उपसरपंच खांडगाव, वाघ विस्तार अधिकारी ग्रामपंचायत पंचायत समिती श्रीगोंदा इत्यादी उपस्थित होते .
चौकट
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सुमारे २५० महिलांना साऊ एकल महिला समिती मार्फत वेगवेगळ्या पोषक डाळींचे किट वाटण्यात आले.. महिला स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात आहारात डाळींचे प्रमाण कमी असते हे त्यांच्या प्रतिकात्मक रित्या लक्षात आणून देण्यासाठी डाळी देण्यात आल्या
उमेदच्या माध्यमातून एकल महिलांचे तालुक्यात जास्तीत जास्त रोजगार सुरू करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा माझा प्रयत्न राहील असे गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी सांगितले