उपकेंद्र राळेगण थेरपाळ येथे सर्वरोग निदान शिबिर,असंख्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संघर्षनामा वृतसेवा । श्रीगोंदा

दि .१७ फेबुवारी २०२६

प्रतीनिधी,

 उपकेंद्र राळेगण थेरपाळ येथे दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत चव्हाण यांच्या आदेशानुसार आयोजित या आरोग्य शिबिराला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

शिबिरामध्ये रक्तदाब (बीपी), रक्तातील साखर (शुगर) तपासणीसह विविध आजारांवर मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. नागरिकांची प्राथमिक तपासणी करून आवश्यक त्या रुग्णांना उपचार व औषधे देण्यात आली. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व दीर्घकालीन आजारांनी त्रस्त रुग्णांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य सेवक पी. बी. प्रदीप जगदाळे, मोरे सिस्टर तसेच आशा कर्मचारी कांचन अवचार, आरती सोनवणे, उज्वला सोनवणे, रिहाना शेख आदींनी परिश्रम घेतले. नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून वेळेत तपासणी व औषध वितरण करण्यात आले.

ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारची आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित करावीत, अशी मागणीही यावेळी नागरिकांकडून करण्यात आली.

Related Post