कै .अनुसया रामचंद्र मांढरे यांचे दुःखद निधन.

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .२५ फेब्रुवारी २०२६

रांजणगाव प्रतिनिधी : -भांबर्डे ता शिरूर येथील कै .अनुसया रामचंद्र मांढरे यांचे दु:खद निधन झाले. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता.त्यांनी गरीबीतुन प्रपंच फुलवला .त्यांना धार्मिक कार्याची आवड होती .त्यांच्या मागे पती, दोन मुले, दोन मुली, दीर, जावा, ननंद, नंदवी, बहीण, पुतने पुतनी ,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. तसेच लक्षण रामचंद्र मांढरे, दतात्रय रामचंद्र मांढरे, सविता जनार्धन शेलार,शैला रमेश पवार यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. रयत शिक्षण संस्था सातारा येथे कार्यरत असलेले शिक्षक संदीप बोरगे यांच्या त्या मावशी तसेच मातंग एकता आंदोलनाचे जनार्धन शेलार व उद्योजक रमेश उर्फ रॉकी पवार यांच्या सासु होत्या. सिने कलाकार व प्रसिद्ध निवेदक लक्ष्मण रामचंद्र मांढरे यांच्या त्या मातोश्री होत.

Related Post