आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . १३ फेबुवारी २०२६

सावरगाव । प्रतीनिधी

मायंबा देवस्थान परिसरात असलेल्या जाज्वल्य संजीवन समाधीस्थळाचे मायंबा देवस्थानचे  आध्यात्मिक तेज अधिक वृद्धिंगत करण्यासाठी ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या समाधी मंदिराच्या भव्य जिर्णोद्धार कार्याला गती देण्यात आली आहे. लाखो-कोटी भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानाचे महात्म्य मानवी जीवनाला सौख्य, समतोल आणि आत्मिक शांती प्रदान करणारे मानले जाते. दर्शनाने अंत:करणी समाधान लाभल्याचा अनुभव भक्त वारंवार व्यक्त करतात.

७२ कोटींच्या खर्चातून साकार होणार भव्य मंदिर :-समाधी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी सुमारे ७२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून संपूर्ण मंदिर नांदेड येथील काळ्या पाषाणात उभारले जाणार आहे. १०० बाय १५० चौरस फूट जागेत उभारण्यात येणाऱ्या या मंदिराची रचना भव्य आणि दिव्य असेल. मंदिर ६४ भव्य खांबांवर उभे राहणार असून प्रत्येक खांबावर ६४ योगिनींची शिल्परचना साकारण्यात येणार आहे.

मंदिर उभारणीसाठी खालीलप्रमाणे देणगी स्वीकारली जात आहे —

शिखर – ₹५१ लाख

ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः – ₹१ लाख

जाळी / खिडकी – ₹५१ हजार

खांब – ₹५१ हजार

आदेश / अलख निरंजन – ₹२१ हजार

मासा / गलथा टॉप / जोता / झालर – ₹२१ हजार

पायरी दगड / गाभारा दगड – ₹११ हजार

गलथा जोता – ₹७ हजार

चिमटा, डमरू, त्रिशूल चित्र – ₹५ हजार

जोता प्लेन दगड / कंगन जोत / भिंत दगड / फरशी – ₹५ हजार

आपला एक दगड नाथ मंदिरासाठी उपक्रम

आपला एक दगड नाथ मंदिरासाठी या धार्मिक उपक्रमांतर्गत प्रत्येक भाविकाने आपल्या श्रद्धेनुसार योगदान द्यावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे व सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी केले आहे.

नाथ परंपरेचा आध्यात्मिक वारसा जपणारे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी श्रद्धेचे भव्य प्रतीक ठरणारे हे मंदिर उभारण्यासाठी भाविकांनी उदंड प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

भविष्यात वाढणाऱ्या नाथ भक्तांचा विचार करून १०८ फूट उंचीचे, चार भव्य द्वार असलेले आणि हजारो वर्षे टिकेल असे मंदिर उभारण्याचा संकल्प ट्रस्टने केला आहे. हे संपूर्ण कार्य भाविकांच्या देणगीच्या माध्यमातून साकार होणार असून पुढील तीन वर्षांत मंदिर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Related Post