न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.७सप्टेंबर २०२४

लिंपणगाव प्रतिनिधी,

 रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली .डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व आजच्या शिक्षक दिनानिमित्त ज्यांच्याकडे शाळा सांभाळण्यासाठी जबाबदारी देण्यात आली असे आजचे विद्यालयाचे मुख्याध्यापक चैतन्य खेतमाळीस व पर्यवेक्षक गौरी पानसरे यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तदनंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षकांविषयी आपल्या भाषणातून आपले विचार मांडले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून विद्यालयातील सर्व सेवक बंधू भगिनींना  गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आले. मुख्याध्यापक होणे सोपे नाही याचा आज मला प्रत्यक्षात अनुभव आला  मुख्याध्यापकांना दिवसभरात विविध कामे पूर्ण करावी लागतात ती कामे पूर्ण करताना  लोकांकडून कसे कामे पूर्ण करून घ्यावे लागतात याची प्रचिती आज मला आली.विद्यार्थी मुख्याध्यापक चेतन्य खेतमाळीस  म्हणाला. तसेच पर्यवेक्षिका गौरी पानसरे ह्याने आपल्या मनोगतात शिक्षक होणे सोपे आहे परंतु ज्ञान प्राप्त करून विद्यार्थ्यांना सुद्धा अद्ययावत  ठेवणे कठीण आहे असे म्हणाली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रणव नलगे यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षण विषयक विचारांविषयी माहिती दिली. मागील शैक्षणिक वर्षापासून विद्यालयातील उपक्रमशील शिक्षकाची निवड विद्यार्थ्यांमधून करण्याची प्रथा सुरू करण्यात आली . या शैक्षणिक वर्षात उपक्रमशील शिक्षक म्हणून प्रणव नलगे यांची निवड करण्यात आली. डोंगरे तेजस्विनी हिने सर्व उपस्थितांचे आभार मानले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सर्व सेवक बंधू भगिनींच्या सहकार्याने शिक्षक दिन समारंभ संपन्न झाला. तसेच शाळेत विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून विद्यालयासाठी साऊंड सिस्टिम भेट म्हणून दिली. मीनाक्षी कदम यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे आभार मानले.

Related Post