संतती,संपत्ती आणि संस्कार या जीवनाला संजीवनी ठरतात-हभप मधुसूदन महाराज

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.७सप्टेंबर २०२४

लिंपणगाव (प्रतिनिधी )-जीवन जगत असताना जीवनातील संतती; संपत्ती आणि संस्कार या तीन गोष्टी महत्त्वाचे आहेत. या तीन गोष्टी सुखी असल्या तरच जीवन सुसह्य व आनंदी राहते ;असे मौलिक विचार ज्येष्ठ कीर्तनकार मधुसूदन शास्त्री महाराज यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. 


      लिंपणगावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व सोपानराव कुरुमकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित प्रवचन रुपी सेवेत उपस्थितांना संबोधित करताना ह भ प मधुसूदन शास्त्री महाराज पुढे म्हणाले की; शब्द हे शास्त्र आहे. तेच शब्द शस्त्र सुद्धा आहे. उचित शब्द वापरला तर मंगलमय होते. त्यामुळे शक्यतो तरुण पिढीने ज्येष्ठ व्यक्तींपुढे नम्रपणा ठेवावा. ज्येष्ठांकडून उज्वल भविष्यासाठी योग्य संस्कारिक मार्गदर्शन घ्यावे. संस्कार हे सर्वात मोठी संपत्ती आहे. शास्त्री महाराज यांनी पुढे आणखी म्हटले आहे की; आत्मा हे अमर असतो. प्रत्येकाने जीवन जगत असताना कीर्तीवंत व्हावे; आशीर्वाद मिळवण्यासाठी जन्मदात्या आई वडिलांची वृद्धापकाळात सेवा महत्त्वाची आहे त्यांचा  विसर होता कामा नये; जीवनामध्ये चोऱ्यामऱ्या व कुणाच्या घराला आगे लावू नये. कर्म करताना चांगले करायचे असेल तर वाईट कुणाचेही करू नये. ते तत्व लिंपणगावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व सोपानराव कुरुमकर यांनी पाळले त्यांचेच अनुकरण इतरांनीही घ्यावे. असे सांगून शास्त्री महाराजांची पुढे म्हणाले की; वर्ष श्राद्ध का करावे? पितृ श्राद्ध का घालावे? भरणे श्राद्ध का करायचे? याविषयी उपस्थित भाविकांना सखोल असे मार्गदर्शन केले. 


   शास्त्री महाराज यांनी पुढे यांची म्हटले आहे की;   सामाजिक व राजकीय क्षेत्रात सोपान अण्णा कुरुमकर यांनी सतत सत्कार्य करत सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. 32 ते 33 वर्षांपूर्वी सोपानराव कुरुमकर यांनी गावच्या सिद्धेश्वर महाराजांच्या सप्ताह मंडळाचा पाया रोवला. आज तो तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आदर्श युक्त सप्ताह ठरला आहे. याबरोबरच त्यांनी सत्तेच्या कालावधीत ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरा सभोवताली भव्य दिव्य तटबंदी बांधून आज हे मंदिर सर्व भाविकांसाठी एक आकर्षण ठरले आहे. असे सांगून शास्त्री महाराजांनी यांनी दिवं. सोपानराव कुरुमकर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश ज्योत टाकला. 


     या सोहळ्यास आमदार बबनराव पाचपुते; नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस; राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा; ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते; घनश्याम अण्णा शेलार; माजी आमदार राहुल जगताप; राजेंद्र म्हस्के; सुभाषराव शिंदे; दीपक पाटील भोसले; राकेश पाचपुते; विठ्ठलराव काकडे; अरुणराव पाचपुते; गणपतराव काकडे; हरिभाऊ कुरुमकर; अण्णासाहेब शेलार; जिजाबापू शिंदे; केशवराव मगर; संदीप नागवडे; सुवर्णाताई पाचपुते; ह भ प संजय महाराज गिरमकर; ह भ प अविनाश महाराज साळुंखे आदींसह जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. 


   सूत्रसंचालन पोपटराव माने यांनी केले. आभार प्रवीण कुरुमकर यांनी मानले.

Related Post