महात्मा फुले नूतन महाविद्यालयात शिक्षक दिन कार्यक्रम साजरा।

संघर्षनामा वृत्तसेवा lकर्जत

 दि.5 सप्टेंबर 2024

प्रतिनिधी, उज्वला उल्हारे

मिरजगाव - येथील महात्मा फुले नूतन महाविद्यालयांमध्ये दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन कार्यक्रम साजरा  करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चंद्रकांत कोरडे व सौ. सरस्वतीताई घोडके उपस्थित होते. डॉ. चंद्रकांत कोरडे यांनी विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असून कर्तृत्ववान व प्रज्ञावंत माणसं घडवण्याचे कार्य शिक्षक करीत असतो, असे मत व्यक्त केले. सौ. सरस्वती घोडके यांनी आपल्या मनोगतामध्ये आई-वडिलांनंतर प्रत्येकाला घडवण्याचे व आकार देण्याचे काम शिक्षक करीत असतो. त्यामुळे आई-वडिलांपेक्षाही शिक्षकांची जबाबदारी अधिक असल्याचे सांगितले.

              या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. तानाजी जाधव हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकत्वाची भूमिका घेऊन चारित्र्यसंपन्न व सुसंस्कृत पिढी घडवण्याचे कार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी कर्जत जामखेडचे आमदार श्री. रोहित दादा पवार यांच्या वतीने मिरजगाव मधील कार्यकर्त्यांकडून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचा व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. याप्रसंगी श्री. भगवानबाबा घोडके, श्री. प्रकाश क्षीरसागर, श्री. तानाजी पिसे, श्री. आदित्य चेडे, श्री. गणेश नलावडे इत्यादी उपस्थित होते. 

           हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी रुरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ए. बी. चेडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रा. विठ्ठल कासले, कुमारी वैष्णवी टकले व श्री राहुल गोरखे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी बांदल हिने तर आभार प्रा. लक्ष्मण साके यांनी मानले.

Related Post