घोगरगाव येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव साजरा...

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.५सप्टेंबर २०२४

घोगरगाव प्रतिनीधी,

अनंत ब्रम्हांड नायक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन दिनाक 5,सप्टेंबर 2024 रोजी , महारष्ट्र शासनाने काढलेले आधी परिपत्रक त्यानुसार घोगरगाव येथे ,ग्रामपंचायत कार्यालय ,तथा छ ,शिवाजी महाराज विद्यालय,तथा, लिटल एन्जल स्कुल ,सर्व शाळा आणि सर्व शासकीय तथा निम शासकीय.कार्यालयात आनंद उत्सवात साजरा करण्यात आला . 

12 व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार घेऊन अनेक जीवांचा उद्धार केला ,सत्य अहिंसा, समता,त्याग, आणि शांती,असे अनेक सामजिक कार्य श्री चक्रधर स्वामींनी केले,12 व्यां शतकात स्पृश्य, अस्पृश्य,वर्ण भेद,जाती भेद, स्री पुरुष विषमता,कर्म कांड, अंधश्रद्धा,अधर्म संचार,त्याने माणूस माणसाला ओळखत नव्हता, समाज वर्णभेद जाती भेद  कडे जात होता..त्या वेळी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपले तत्वज्ञान सांगुण सत्य धर्माची स्थापना केली,माणसाला समानतेचा हक्क दिला, अंधश्रद्ध पासून दूर केले, व्यसना पासून दूर केले,जीव देवता प्रपंच परमेश्वर यांचे ज्ञान दिले, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मनुष्या प्रमाणे पशू, पक्षी, प्राणिमात्रावर दया दाखवली,त्यांना मनुष्या प्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार दिला, मांसाहार करू नये,कोणाचे अंतकरण दुःखु नये ,प्रिय भाषण करावे ,अशी अनेक शिकवण समाजाला दिली..त्या श्री चक्रधर स्वामी चा अवतार दीन राज्यव्यापी सर्व शासकीय ठिकाणी साजरा करण्यात आला...

घोगरगाव येथे  श्रीगोंदा तालुका महानुभाव परिषदचे अध्यक्ष प,पू श्री अविनाश बाबा धाराशिवकर ,(घोगरगाव) 

महंत मंडळीक बाबा  तथा सर्व घोगरगाव ग्रामस्थ ,भाविकभक्त,यांच्या उपस्थितीत श्री चक्रधर स्वामी अवतार दिन संपन्न झाला.

Related Post