उपसरपंच पदी महेश तावरे यांची बिनविरोध निवड .

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा  दि.५सप्टेंबर २०२४ 

प्रतिनिधी,

तालुक्यातील म्हातारपिंप्री ग्रामपंचायतच्या प्रीती अनिल पोकळे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर महेश मोहन तावरे यांची आज दि. ४ सप्टेंबर रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया सरपंच सौ. ज्योत्सना देविदास हिरडे व ग्रामविकास अधिकारी स्वाती लामकाने मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.


म्हातारपिंप्री गावचे युवा कार्यकर्ते महेश मोहन तावरे यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत एनएसयुआय जिल्हाध्यक्ष अहमदनगर, श्रीराम पतसंस्था संचालक, म्हातारपिंप्री ग्रामपंचायत सदस्य अशी पदे भूषवल्यानंतर त्यांनी विकास कामांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला त्यांच्या कामाची दखल म्हणून नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी तावरे यांची जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष पद देऊन काम करण्याची संधी दिली. प्रामाणिकपणाने काम केल्याने नागवडे कारखान्याचे माजी संचालक म्हातारपिंप्री गावचे नेते विलासकाका वाबळे यांनी तावरे यांना उपसरपंच पदाची जबाबदारी दिली.


या निवडप्रक्रिये वेळी उपस्थित विद्यमान सरपंच सौ. ज्योत्सना हिरडे, माजी सरपंच मनीषा ठोकळे, माजी उपसरपंच प्रीती पोकळे, माधुरी हिरडे, ग्रामपंचायत सदस्य रमेश घोडके, सागर शिरसाठ, सुवर्णा गाडेकर या सर्वांच्या बहुमोल सहकार्याने माझी उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली असे नवनिर्वाचित उपसरपंच महेश तावरे यांनी बोलताना सांगितले.


या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते अनिल वाबळे, माझी चेअरमन शहाजी हिरडे, माजी सरपंच बापूसाहेब हिरडे, युसूफ खान, ऋषिकेश वाबळे, सतीश हिरडे, सोसायटी चेअरमन परेश वाबळे, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन वाबळे, प्रगतशील शेतकरी अंबादास तावरे, बाळासाहेब तावरे, बंडू तावरे, वैभव तावरे, अनिल पोकळे, सुहास शिरसाठ, शशिकांत वाबळे, दत्ताभाऊ हिरडे, विलास महामुनी, सचिन ठोकळे, रमजान शेख, बाळकृष्ण शिरसाठ, सोनू निंबाळकर, एकनाथ शिंदे, संदीप गायकवाड, समीर खान, संदीप गाडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


महेश तावरे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालिका व जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा अनुराधाताई नागवडे, आदेश नागवडे, विलासकाका वाबळे, सुभाषकाका शिंदे, पृथ्वीराज नागवडे, संदीप औटी, अतुल लोखंडे यांनी अभिनंदन केले.

Related Post