संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.४ , सप्टेंबर २०२४
श्रीगोंदा- प्रतिनिधी,
अनंत ब्रम्हांड नायक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दीन दिनाक 5,सप्टेंबर 2024 रोजी , महारष्ट्र शासनाने काढलेले आधी परिपत्रक त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रत शासकीय तथा निम प्रशासकीय कार्यालय येथे साजरा करण्यात येणार आहे,..12 व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार घेऊन अनेक जीवांचा उद्धार केला ,सत्य अहिंसा, समता,त्याग, आणि शांती,असे अनेक सामजिक कार्य श्री चक्रधर स्वामींनी केले,12 व्यां शतकात स्पृश्य, अस्पृश्य,वर्ण भेद,जाती भेद, स्री पुरुष विषमता,कर्म कांड, अंधश्रद्धा,अधर्म संचार,त्याने माणूस माणसाला वोळखत नव्हता, समाज वर्णभेद जाती भेद कडे जात होता..त्या वेळी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपले तत्वज्ञान सांगुण सत्य धर्माची स्थापना केली,माणसाला समानतेचा हक्क दिला, अंधश्रद्ध पासून दूर केले, व्यसना पासून दूर केले,जीव देवता प्रपंच परमेश्वर यांचे ज्ञान दिले, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मनुष्या प्रमाणे पशू, पक्षी, प्राणिमात्रावर दया दाखवली,त्यांना मनुष्या प्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार दिला, मांसाआहार करू नये,कोणाचे अंतकरण दुःखु नये ,प्रिय भाषण करावे ,अशी अनेक शिकवण समाजाला दिली..त्या श्री चक्रधर स्वामी चा अवतार दीन राज्यव्यापी साजरा व्हावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र भर निवेदन देण्यात आले...
आपल्या श्रीगोंदा तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.त्या प्रसंगी श्रीगोंदा तालुका महानुभाव परिषदचे अध्यक्ष प,पू श्री अविनाश बाबा धाराशिवकर ,(घोगरगाव) उपाध्यक्ष. पू श्री बाळकृष्ण दादा मनेकर, श्री दिलीप शेट दांडणायक,. पू श्री अशोकराज बाबा अमृते,त पू मीराताई मानेकर,पू श्री,सुबोधमुनी बाबा आराध्य,. डॉ,अभिजित तीवाटणे, मा,किशोर उगले,श्री बंडू ढवळे,श्री.अविनाश औटी, कोंडीराम दंडणाईक, डॉ ,अरुण ढवळे, संजय दंडणाईक आदी उपस्थितानी निवेदन देऊन श्री चक्रधर स्वामी अवतार दीन महोत्सव सर्व शासकीय कर्यालयात साजरा करण्यात यावा अशी विनंती केली.