पतीच्या स्मरणार्थ पत्नीने केले वृक्षारोपण.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.३ सप्टेंबर २०२४

लिंपणगाव ( प्रतिनिधी)  मढेवडगाव येथील प्रतिक पेट्रोल पंपाच्या संचालिका श्रीमती नयनतारा शिंदे यांनी पती कै. पोपटराव शिंदे यांच्या स्मरणार्थ दावल मलिक माळावर ५५  वृक्षांचे वृक्षारोपण करण्याचा अनोखा उपक्रम राबविला.  याबाबत बोलताना नयनतारा शिंदे म्हणाल्या की,  आज निसर्ग संवर्धन व संगोपन करणे ही नितांत गरजेची बाब झालेली आहे.  पतीच्या अकालीन् निधनानंतर आई वडील भाऊ तसेच सासरच्या शिंदे परिवाराच्या भक्कम पाठिंबामुळे मी उभी राहू शकले व आज स्वतःचा उद्योग व्यवसाय यशस्वीरित्या करीत आहे. पतीच्या स्मरणार्थ सतत काहीतरी करण्याची भावना मनामध्ये आहे. म्हणून यापूर्वीही वृक्षारोपण व इतर उपक्रम राबविलेले आहेत.  सध्या पर्यावरणातील प्रदूषण कमी करणे व निसर्ग संवर्धना करिता काही तरी करणे आवश्यक असल्याची भावना मनामध्ये निर्माण झाल्यामुळे मढेवडगाव येथील दावल मलिक माळावर करंजी 25,  चिंच 15 , गुलमोहर चाफा अशी एकूण 55 वृक्षांचे रोपण करण्यात आले.  सदर प्रसंगी वृक्षारोपणाकरिता खड्डे खोदण्यासाठी सुरेश पवार यांनी फक्त इंधन टाकून जे.सी.बी. मशीन उपलब्ध करून दिले.  यावेळी श्रीमती नयनतारा शिंदे यांच्या समवेत श्रीमती राणीताई शिंदे,  मेजर नवनाथ शिंदे,  हरून इनामदार,  निखिल राहिंज,  प्रशांत शिंदे,  प्रवीण शिंदे,  पंकज उंडे,  प्रसाद उंडे, धनराज जाधव,  दादा ढवळे, विशाल मोहरकर,  विनोद सोनवणे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Post